Snake Attack | सहा फुटी सापाचा पायाला विळखा; खुरप्याने केले दोन तुकडे

निगवे खालसा येथील घटना; मृत सापासह गाठले रुग्णालय
Snake Attack |
Snake Attack | सहा फुटी सापाचा पायाला विळखा; खुरप्याने केले दोन तुकडे
Published on
Updated on

निगवे खालसा : शेतात जनावरांसाठी वैरण आणायला गेलेल्या शेतकऱ्याच्या पायाला ६ फुटी सापाने घट्ट विळखा घालून दंश केला. मात्र, अशा कठीण प्रसंगातही न डगमगता शेतकऱ्याने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सोबत असलेल्या खुरप्याने सापाचे दोन तुकडे करून मृत साप घेऊन थेट सीपीआर रुग्णालय गाठले. दिलीप सदाशिव कोळी (वय ३९) असे शेतकऱ्याचे नाव असून सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

दिलीप कोळी दुचाकीवरून वैरण आणण्यास गेले होते. शेतातील साचलेल्या पाण्यातून चालत जात असताना अचानक ६ फुटी सापाने त्यांच्या पायाला विळखा घालत दंश केला. कोळी यांनी प्रसंगावधान राखत एका हाताने सापाला दाबून धरले व दुसऱ्या हाताने त्याचा विळखा सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सापाची पकड सुटत नसल्याने त्यांनी वैरणीसाठी आणलेल्या खुरप्याने सापावर वार करून त्याचे दोन तुकडे केले. वैरणीच्या दोरीने सर्पदंश झालेल्या जागेच्या वरच्या बाजूला पायाला घट्ट बांधले. त्यानंतर सापाचे दोन्ही तुकडे दुचाकीवरून घरी आणून मित्रांना घडलेला प्रकार सांगितला. मित्र राम कांजर व इतर सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी मृत सापाच्या तुकड्यांसह सीपीआर गाठले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news