Two-Wheeler Theft | चैनीसाठी दुचाकी चोरणाऱ्यास अटक

Two-Wheeler Theft |
Two-Wheeler Theft | चैनीसाठी दुचाकी चोरणाऱ्यास अटक
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : चैनीसाठी दुचाकींची चोरी करणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. तेजस आनंद गुरखे (वय २२, रा. महावितरण ऑफिससमोर, यादवनगर, राजारामपुरी, कोल्हापूर) असे त्याचे नाव असून, त्याच्याकडून पाच दुचाकी जप्त केल्या आहेत.

शाहूपुरी येथील दुचाकी चोरीचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक करत होते. चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी तेजस गुरखे फुलेवाडी येथील एका हॉटेलसमोर येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना मिळाली होती. यानुसार पथकाने शुक्रवारी (दि. २७) सापळा रचून गुरखेला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने शाहूपुरी येथून चार दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली. तसेच गुन्ह्यात वापरलेली एक अशा पाच दुचाकी जप्त केल्या.

पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संजय कुंभार, सागर माने, सत्यजित सावंत, लखनसिंह पाटील, संदीप बेंद्रे, विशाल चौगले, विजय इंगळे, संदीप सावंत, महेश पाटील, संजय हुंबे, अरुण धनगर व सागर चौगले यांनी ही कारवाई केली.

हॉटेलमध्ये काम अन्...

संशयित तेजस गुरखे हा फुलेवाडी येथील एका हॉटेलमध्ये काम करत होता. गेल्या काही दिवसांपासून तो पोलिसांना चकवा देत होता. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक त्याच्या मागावर होते. अखेर शुक्रवारी त्याला अटक केली. चैनीसाठी दुचाकींची चोरी करत असल्याची कबुली त्याने दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.