Fake Food and Drug Officer | `अन्‍न-औषध`चे अधिकारी असल्याच्या बहाण्याने खंडणी उकळणाऱ्यास अटक

साथीदाराचा शोध सुरू; सुळे येथील व्यावसायिकास कारवाईची धमकी
Fake Food and Drug Officer |
Fake Food and Drug Officer | `अन्‍न-औषध`चे अधिकारी असल्याच्या बहाण्याने खंडणी उकळणाऱ्यास अटक Pudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : अन्‍न व औषध अधिकारी असल्याची बतावणी करून व्यावसायिकाला कारवाईची भीती दाखवून १० हजारांची खंडणी मागणाऱ्या दोघांवर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद धनाजी मारुती पाटील (वय ३८, रा. सुळे, ता. पन्हाळा) यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दिली.

यानुसार महादेव नामदेव लोहार (३५, रा. सुतार गल्ली, गोगवे, ता. शाहूवाडी) याला अटक केली असून, प्रशांत सर्जेराव यादव (रा. पिशवी, ता. शाहूवाडी) याचा शोध सुरू आहे. धनाजी पाटील यांचे सुळे (ता. पन्हाळा) येथे नाष्टा सेंटर व पान शॉप आहे. मंगळवारी (दि. १) संशयित महादेव व प्रशांत या ठिकाणी आले. त्यांनी धनाजी पाटील यांना, आम्ही अन्‍न व औषध प्रशासनाचे अधिकारी असून, परवाना नसताना व्‍यवसाय करत असल्‍याची तक्रार असून आम्‍ही दुकान सिल करणार असल्याची भीती घातली.

कारवाई टाळायची असल्यास १० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगून मोबाईल नंबर देऊन दोघेही निघून गेले. धनाजी पाटील यांना संशय आल्यामुळे त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्याकडे तक्रार केली. दरम्यान, दुपारी २ वाजता दोघा संशयीतांनी धनाजी पाटील यांना लक्ष्मीपुरी येथे बोलाविले असता, लक्ष्मीपुरी पोलिसांनी महादेवला अटक केली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक खंडू गायकवाड करत आहेत.

महादेववर चार गुन्हे

अटक केलेल्या महादेव लोहार याच्यावर जिल्ह्यात ४ गुन्हे दाखल आहेत. लक्ष्मीपुरी व इस्पुर्ली येथे २०१८ मध्ये फसवणुकीचे तीन, तर शाहूवाडी येथे २०२२ मध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. दरम्यान, दोघांनी अशाच प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news