Kolhapur tourists cheated | कोल्हापूरच्या पर्यटकांची दुबईत फसवणूक करणार्‍याला अटक

दुबईचे चलन देतो सांगून चौघांना सात लाखांचा गंडा
Kolhapur tourists cheated
Kolhapur tourists cheated | कोल्हापूरच्या पर्यटकांची दुबईत फसवणूक करणार्‍याला अटकPudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : दुबई सहलीदरम्यान स्वस्तात स्थानिक चलन (दिरहम) देण्याचे आमिष दाखवून कोल्हापुरातील चौघा पर्यटकांची तब्बल 7 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक करणार्‍या ट्रॅव्हल एजंटला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. भाऊराव त्र्यंबक घोलप (वय 38, सध्या रा. सांगली, मूळ रा. नाशिक) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

याप्रकरणी त्याची साथीदार चंद्रकला जयवंत नेरकर हिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोलप याने कोल्हापुरात ‘गणेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ आणि नंतर सांगलीत ‘चैतन्य हॉलिडेज’ नावाने कंपन्या सुरू करून ही फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. महिपती पुंडलिक पाटील (59, रा. बाबुराव साळुंखे पार्क, आयटीआयमागे, कळंबा) यांनी त्यांच्याविरुद्ध 12 ऑगस्ट 2025 रोजी फिर्याद दाखल केली. घोलप याने गेल्यावर्षी कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नर येथे गणेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाने कंपनी सुरू केली होती. त्यावेळी त्याच्याकडे काही लोकांनी दुबईला फिरण्यासाठी बुकिंग केले.

पाटील यांनी 17 ते 23 जानेवारी 2024 या कालावधीत दुबई येथे फिरायला गेल्यावर दुबईमधील चलन मागितले होते. त्यासाठी त्यांनी घोलप व नेरकर यांना भारतीय चलनानुसार 2 लाख रुपये दिले होते. मात्र, त्या बदल्यात फक्त 1,100 दिरहम (भारतीय चलनानुसार 25 हजार रुपये) दिले. उर्वरित 1 लाख 75 हजार रुपयांचे चलन दिले नाही. रवी श्रीनिवास नायडू यांच्याकडून 3 लाख 15 हजार रुपये घेऊन प्रत्यक्षात 1,100 (भारतीय चलनानुसार 25 हजार रुपये) देऊन उर्वरित 1 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केली. बाबाजी गजानन चाचुर्डे यांच्याकडून 1 लाख 20 हजार रुपये सहलीसाठी व 1 लाख 50 हजार रुपये चलनासाठी घेतले. शशिकांत मारुती पाटील यांचे 1 लाख 20 हजार रुपये सहलीसाठी घेऊन भरलेले पैसे परत न करता फसवणूक केली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news