मेजर जनरल शशिकांत पित्रे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

कोल्हापूर : राजाराम महाविद्यालयाचा जीवनगौरव पुरस्कार मेजर जनरल शशिकांत पित्रे व सौ. पित्रे यांना प्रदान करताना खा. शाहू महाराज, माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे. समवेत प्राचार्य डॉ. अनिता बोडके, प्राचार्य दिनकर पाटील आदी.
कोल्हापूर : राजाराम महाविद्यालयाचा जीवनगौरव पुरस्कार मेजर जनरल शशिकांत पित्रे व सौ. पित्रे यांना प्रदान करताना खा. शाहू महाराज, माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे. समवेत प्राचार्य डॉ. अनिता बोडके, प्राचार्य दिनकर पाटील आदी. (छाया : मिलन मकानदार)
Published on
Updated on

कोल्हापूर : राजाराम महाविद्यालयाच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार यावर्षी माजी राजारामीयन मेजर जनरल शशिकांत पित्रे व सौ. पित्रे यांना खासदार शाहू महाराज व माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना मेजर जनरल पित्रे म्हणाले, माझ्या आयुष्याला वळण लावण्यात राजाराम महाविद्यालयाचा सिंहाचा वाटा आहे. शिक्षकांनी जे ज्ञान, शिस्तीचे धडे दिले त्याच्या बळावर मेजर जनरल पदावरील माझ्या कार्याला पूर्ण न्याय देऊ शकलो. खासदार शाहू महाराज यांनी राजाराम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महापुरुष व महाविद्यालयात घडलेल्या मान्यवरांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून वाट चालावी, असा संदेश दिला. डॉ. माणिकराव साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्राचार्य डॉ. अनिता बोडके, प्राचार्य दिनकर पाटील, बाळ पाटणकर उपस्थित होते.

राजाराम महोत्सवांतर्गत शनिवारी (दि. 28) सकाळी 10.30 वाजता वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news