Jewellery theft arrest | नऊ तोळे दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला : साथीदारासह अटक

घरातील साहित्य स्थलांतर करताना सोने लंपास
Jewellery theft arrest |
Jewellery theft arrest | नऊ तोळे दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला : साथीदारासह अटकFile Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : साथीदाराच्या मदतीने मोलकरणीने नऊ तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला असून राजारामपुरी पोलिसांनी वैशाली सिद्धाप्पा भुमन्नावर (रा. प्रतिभानगर) व तिचा साथीदार रवी यांना अटक केली.

राहुल नारायण हावळ (39, रा. राजारामपुरी) यांचा सराफ व्यवसाय आहे. ते पूर्वी प्रतिभानगर येथील नलवडे कॉलनीत वास्तव्यास होते. 9 जानेवारी ते 20 फेब—ुवारीदरम्यान घर बदलून ते भारत हौसिंग सोसायटीत राहण्यास आले. घरातील साहित्य स्थलांतर करताना ड्रॉवरमध्ये सुमारे नऊ तोळ्यांचा ऐवज गहाळ झाल्याचे निदर्शनास आले. घरकाम करणारी वैशाली भुमन्नावर हिच्यावर संशय आल्याने हावळ यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर वैशालीने साथीदाराच्या मदतीने दागिने चोरल्याची कबुली दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news