

कोल्हापूर : कोल्हापूर दौर्यावर नुकतेच येऊन गेलेले केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा दौरा यशस्वी झाल्याबद्दल महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा रविवारी (दि. २८) शहरातील एका हॉटेलमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्वप्रथम उपस्थिती लावली. तेव्हा हॉटेलमध्ये त्यांना वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर दिसले नाहीत. त्यांनी अन्य पदाधिकार्यांना मुश्रीफ, आबिटकर कुठे आहेत, अशी विचारणा केली. फोनवरून संपर्क साधत ते कुठेपर्यंत पोहोचलेत याची माहिती घेतली. दरम्यानच्या काळात त्यांनी उपस्थित असलेले महायुतीचे अन्य नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची विचारपूस केली. यानंतर मंत्री मुश्रीफ, मंत्री आबिटकर हॉटेलमध्ये दाखल झाल्यानंतर महायुतीच्या सर्व नेत्यांनी कोणतीही राजकीय चर्चा न करता एकत्रित भोजन केले. मंत्री मुश्रीफ, मंत्री आबिटकर यांनी शाकाहारी भोजनाचा आस्वाद घेतला, तर मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार संजय घाटगे, जनसुराज्यचे समित कदम यांच्यासह प्रमुख पदाधिकार्यांनी तांबडा-पांढरा रस्स्यावर ताव मारला.