Kolhapur Panchayat Samiti | कोल्हापूर जिल्ह्यात पंचायत समितींवर महायुतीचे वर्चस्व

12 पैकी 9 ठिकाणी सत्ता; तीन समिती काँग्रेसकडे : शाहूवाडीत जनसुराज्य शक्ती पक्षाची सरशी
panchayat-samiti-chairperson-posts-karveer-panhala-open
करवीर, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड पं.स. सभापतिपद खुले
Published on
Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती निवडणुकांमध्ये महायुतीने स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केले. जिल्ह्यातील 12 पैकी तब्बल 9 पंचायत समित्यांवर महायुतीच्या घटक पक्षांनी सत्ता मिळवत बाजी मारली. तर, काँग्रेसला तीन पंचायत समित्यांमध्ये यश मिळाले असून, शाहूवाडी पंचायत समितीवर जनसुराज्य शक्ती पक्षाने सत्ता काबीज केली.

पन्हाळा पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युतीने बाजी मारली. सभापतिपदी शिवसेनेचे रवींद्र बंडू पाटील तर उपसभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भारती शिवाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीला आमदार विनय कोरे यांनी संमती दिली. गडहिंग्लज पंचायत समितीवर महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता काबीज केली. सभापतिपदी डॉ. प्रतिभा चव्हाण तर उपसभापतिपदी अमर हिडदुग्गी यांची बिनविरोध निवड झाली. चंदगड पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व कायम राखत सभापतिपदी प्रा. विलास नाईक आणि उपसभापतिपदी संज्योती माळवीकर यांची निवड केली.

आजरा पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयश्री गाडे यांची सभापतिपदी तर शिवसेना (उद्धव सेना)च्या यशोदा पोवार यांची उपसभापतिपदी निवड झाली. गगनबावडा पंचायत समितीवर काँग्रेसने वर्चस्व राखत सभापतिपदी छाया प्रकाश देसाई तर उपसभापतिपदी राजेश भगवान पाटील यांची बिनविरोध निवड केली.

शाहूवाडी पंचायत समितीत जनसुराज्य शक्ती पक्षाने बाजी मारली. सभापतिपदी प्रियांका तानाजी भोसले तर उपसभापतिपदी अमरसिंह खोत यांची निवड झाली. येथे शिवसेना व राष्ट्रवादीचे समसमान सदस्यसंख्या असल्याने चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली आणि त्यामध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवारांना संधी मिळाली.

भुदरगड पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकला. सभापतिपदी विक्रमसिंह शामराव पाटील तर उपसभापतिपदी अरुणा प्रशांत देसाई यांची बिनविरोध निवड झाली. राधानगरी पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकला. सभापतिपदी आर. वाय. पाटील तर उपसभापतिपदी अश्विनी चौगुले यांची 6 विरुद्ध 4 मतांनी निवड झाली. कागल पंचायत समितीत भाजपचे कमळ फुलले. सभापतिपदी समरजित घाटगे गटाच्या सुवर्णा पाटील तर उपसभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे इंद्रजित पाटील यांची बिनविरोध निवड झाली. करवीर पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे साताप्पा धोंडीराम पाटील सभापतिपदी तर भाजपच्या दीपाली संजय पाटील उपसभापतिपदी बिनविरोध निवडून आल्या.

हातकणंगले पंचायत समितीवर भाजपने वर्चस्व राखत सभापतिपदी अश्विनी बिरांजे तर उपसभापतिपदी संतोष कांबळे यांची निवड केली. शिरोळ पंचायत समितीत आमदार राजेंद्र पाटील-यड्रावरकर यांच्या राजर्षी शाहू विकास आघाडीने सत्ता कायम राखत सभापतिपदी मिलिंद कुरणे तर उपसभापतिपदी मनीष कदम यांना संधी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news