मोबाईलवर तक्रार नोंदवा ; महावितरणचा डिजिटल आग्रह

Mahavitaran news | ‘तक्रार नोंदणीसाठी ऑनलाइन सुविधांवर भर’
Mahavitaran news
Mahavitaran news Pudhari
Published on
Updated on

शिरढोण

बिरू व्हसपटे : वीजपुरवठ्याशी संबंधित तक्रारींची नोंद आता अधिक सुलभ, जलद आणि सुरक्षित पद्धतीने व्हावी, यासाठी ग्राहकांनी डिजिटल सुविधांचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. कर्मचाऱ्यांची सुरक्षितता, तक्रारींवरील तत्काळ कार्यवाही आणि ग्राहकांना जलद सेवा देण्यासाठी मोबाईल ॲप, व्हॉट्सॲप व एसएमएस या माध्यमांतून तक्रार नोंदविण्यावर भर देण्यात येत आहे.

महावितरणकडे वीजपुरवठा खंडित होणे, कमी-जास्त दाब, तांत्रिक बिघाड, ट्रान्सफॉर्मर नादुरुस्ती यांसारख्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येतात. अनेक ग्राहक थेट कार्यालयात किंवा कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून तक्रार नोंदवितात. मात्र, त्यामुळे वेळेचा अपव्यय होण्याबरोबरच अनावश्यक गर्दीही वाढते. तक्रार नोंदणी अधिक गतिमान आणि सुरक्षित करण्यासाठी डिजिटल माध्यमे अधिक उपयुक्त ठरत असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

‘महावितरण’ मोबाईल ॲपवरून ग्राहकांना सर्व प्रकारच्या वीजसंबंधित तक्रारी तत्काळ नोंदविता येतात. तसेच ९१६७७७७७९१ या व्हॉट्सॲप क्रमांकावर ‘Hi’ पाठवूनही तक्रार नोंदविता येते. याशिवाय एसएमएसद्वारेही तक्रार नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

डिजिटल माध्यमातून आलेल्या तक्रारींवर प्राधान्याने कार्यवाही करून त्यांचे जलद निवारण केले जाणार आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज यंत्रणांवरील ताण लक्षात घेता ही सेवा अधिक प्रभावी करण्यात आली असून ग्राहकांनी डिजिटल सुविधांनाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

‘एक क्लिक, तक्रार फिक्स’

  • वीज तक्रारींसाठी आता महावितरणने डिजिटल मार्ग अधिक सोपा आणि वेगवान केला आहे.

  • ‘महावितरण’ मोबाईल ॲपवरून ग्राहकांना काही क्षणांत तक्रार नोंदविता येणार आहे.

  • ९१६७७७७७९१ या व्हॉट्सॲप क्रमांकावर ‘Hi’ पाठवूनही तक्रार तत्काळ नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे.

  • एसएमएसद्वारेही तक्रार नोंदणीची सोय उपलब्ध करून ग्राहकांसाठी प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे.

  • डिजिटल तक्रारींना प्राधान्य दिल्याने जलद निवारणासह कार्यालयातील गर्दीही टाळता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news