kolhapur | महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरूचे काळम्मावाडीच्‍या जंगलात दर्शन

kolhapur |
kolhapur | महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरूचे काळम्मावाडीच्‍या जंगलात दर्शन
Published on: 
Updated on: 

काळम्मावाडी : राधानगरी अभयारण्यात महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेल्या शेकरूचे दर्शन घडल्याने निसर्गप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मांजरखिंड ते काळम्मावाडी धरण मार्गावर जंगलभ्रमंती करत असताना प्रीतम पाटील यांच्या निदर्शनास हा आकर्षक वन्यप्राणी आला. झाडांच्या फांद्यांवर मुक्तपणे वावरणार्‍या शेकरूचे सुंदर छायाचित्र त्यांनी कॅमेर्‍यात टिपले.

शेकरू म्हणजेच भारतीय विशाल खार. हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी असून त्याच्या आकर्षक रंगसंगतीमुळे आणि लांब, दाट शेपटीमुळे तो विशेष ओळखला जातो. तांबूस-केशरी, तपकिरी आणि पांढर्‍या रंगांच्या छटा असलेला हा प्राणी प्रामुख्याने घनदाट जंगलातील उंच झाडांवर वास्तव्य करतो. शेकरूसारखे वन्यजीव प्रामुख्याने मोठ्या वृक्षांवर आणि घनदाट जंगलावर अवलंबून असतात. राधानगरी परिसरातील समृद्ध वनसंपदा आणि जैवविविधतेची प्रचिती या घटनेतून पुन्हा एकदा आली आहे. आपल्या परिसरात राज्यप्राणी मुक्तपणे वावरताना दिसणे ही निसर्गप्रेमींसाठी समाधानाची बाब आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.