'आरोग्याची वारी पंढरीच्या दारी' अंतर्गत यंदा साडेपंधरा लाख वारकऱ्यांची आरोग्य तपासणी

'पुढारी NEWS विकास SUMMIT 2024'मध्ये आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा संवाद
Pudhari News Vikas SUMMIT 2024
'पुढारी NEWS विकास SUMMIT 2024'मध्ये मंत्री तानाजी सावंत यांनी संवाद साधला. (Pudhari Photo)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'आरोग्याची वारी पंढरीच्या दारी' उपक्रमाचे यंदाचे दुसरे वर्षे आहे. या उपक्रमांतर्गत २०२३ पहिल्यांदा साडेअकरा लाख वारकऱ्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. तर ५ लाख वारकऱ्यांची डोळे तपासणी करण्यात आली. २०२४ मध्ये साडेपंधरा लाख वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये महाराष्ट्राची नोंद करण्यात आली, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी आज (दि.१३) 'पुढारी NEWS विकास SUMMIT 2024'मध्ये बोलताना सांगितले. मंत्री तानाजी सावंत यांची मुलाखत पुढारी न्यूजचे नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्न जोशी यांनी घेतली.

'आवाज जनतेचा' हे ब्रीद घेऊन अल्पावधीतच महाराष्ट्रातील जनमाणसावर अमिट छाप उमटवणाऱ्या 'पुढारी NEWS' ने 'विचारमंथन मान्यवरांचे, स्वप्न नव्या महाराष्ट्राचे' या संकल्पनेवर आधारित आयोजित 'पुढारी NEWS विकास SUMMIT 2024'ला आज 13 ऑक्टोबर रोजी सुरुवात झाली. या विकास समिटमध्ये महाराष्ट्रातील उद्योग, महिला कल्याण, आरोग्य व कृषी या क्षेत्रातील सर्वांगिण विकासावर राज्यातील मंत्री, तज्ज्ञ, समाजसेवक, धोरणकर्ते आदी मान्यवरांकडून चर्चा या माध्यमातून चर्चा केली जात आहे. द फर्न हॉटेल, कोल्हापूर येथे हे विकास समिट सुरु असून त्याचे थेट प्रक्षेपण पुढारी न्यूज चॅनेलवरुन सुरु आहे.

'आरोग्याची वारी पंढरीच्या दारी' उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवला

माझे वडील आळंदीला पायी चालत जायचे. आमचे कुटुंब वारीशी निगडीत आहे. महाराष्ट्रात पंढरपूर वारीला सांप्रदायिक महत्त्व फार मोठे आहे. ज्या ज्या ठिकाणावरून पालखीचे प्रस्थान होते. तेथे फिरते दवाखाने ठेवले. चार बेड हॉस्पिटलची व्यवस्था केली. २ हजार ते अडीच हजार डॉक्टर ठेवले. नर्सिंग स्टाफ ठेवला. त्यांची सर्व व्यवस्था केली. यामुळे 'आरोग्याची वारी पंढरीच्या दारी' उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवण्यात आला, असे तानाजी सावंत म्हणाले.

'कोणताही रोडमॅप तयार करण्यासाठी आधी ते सर्व जगाव लागतं'

सोलापुरातील १९७२-७३ सालातील घटना. आई कुटुंब प्रमुख, वडील वारकरी सांप्रदायाशी संबधित आहेत. त्यासाठी कोणताही रोडमॅप तयार करण्यासाठी आधी ते सर्व जगाव लागते. माता सुरक्षा अभियानात आशा वर्कर्स यांना सहभागी करुन घेण्यात आले. त्यानंतर प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीत प्रत्येक जिल्ह्याला माता सुरक्षा योजनेसाठी २ कोटी रुपये देण्यात आले, असे त्यांनी नमूद केले.

माता सुरक्षित तर घर सुरक्षित

अभियांत्रिकी पार्श्वभूमी असलेले पण त्यांचे सामाजिक काम पाहून आरोग्य खाते मंत्री सावंत यांच्याकडे सोपवण्यात आले. 'माता सुरक्षित घर, सुरक्षित' अभियानातर्गंत १८ वर्षावरील ४ कोटी १९ लाख महिलांना या योजनेचा २ वर्षात लाभ मिळाला, असे त्यांनी सांगितले.

माता मृत्यू दर कमी करण्यात महाराष्ट्र देशात दोन नंबरवर

आरोग्य योजनांमध्ये देशात महाराष्ट्र माता मृत्यू दर कमी करण्यात दोन नंबरवर आहे. तसेच बाल मृत्यूदर देशामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. तो अधिक कमी करण्यावर आम्ही भर देत आहोत, असे तानाजी सावंत म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news