Solar Power Projects : राज्यात मोठ्या धरणांवर होणार सौरऊर्जा निर्मिती

धरणांच्या माहिती संकलनाचे काम युद्धपातळीवर सुरू
Radhanagari Dam
राधानगरी धरण
Published on
Updated on

सुनील सकटे

कोल्हापूर : राज्य सरकारने सौर उर्जा निर्मितीवर मोठ्या प्रमाणात भर दिला आहे. रुप टॉप सोलर, सौर कृषीपंप, सौर कृषी वाहीनी, याबरोबरच शासकीय कार्यालयाच्या इमारतींवरही सौर योजना राबविण्यात येत आहे. आता राज्यातील धरणातील पाण्याच्या क्षेत्रावर सौरऊर्जा निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यातील मोठ्या धरणांवर ही योजना राबविण्यात येणार असून, धरणांची माहिती संकलनाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.

घरगुती, व्यापारी, औद्योगिक आणि कृषी अशा सर्व प्रकारच्या ग््रााहकांकडून सध्या सौरऊर्जा निर्मिती करण्यात येत आहे. रुप टॉप सोलर या योजनेव्दारे सौर उर्जा निर्मिती वाढविण्यासाठी या ग््रााहकांना अनुदान दिले जात आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी आणि कृषीपंपांचा वीज वापर सौर उर्जेवर आणण्यासाठी सौर कृषीपंप योजना तर मुख्यमंत्री सौर कृषी वाहीनी योजना राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून राज्यात हजारो मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती केली जात आहे. शासकीय इमारतींच्या छतांचा वापर करुन मोठ्या प्रमाणात सौरऊर्जानिर्मिती केली जात असून, अनेक शासकीय कार्यालयांचे वीजबील शून्य होण्याच्या मार्गावर आहे. याबरोबरच आता धरणातील पाणीसाठा असणाऱ्या परिसरात सोलर पॅनेल बसवून सौरऊर्जा निर्मिती केली जाणार आहे. याकरीता प्रथम मोठ्या धरणांचा विचार करण्यात आला आहे. मोठ्या धरणावर अशी यंत्रणा बसवून सौरऊर्जानिर्मिती केली जाणारआहे.

महाराष्ट्रातील प्रमुख मोठे सिंचन प्रकल्प

कोयना (सातारा), जायकवाडी (छत्रपती संभाजीनगर), उजनी (सोलापूर), गोशी खुर्द (भंडारा), अपर वर्धा (अमरावती), लोअर वर्धा (वर्धा), वन्ना (अकोला), वाघुर (जळगाव), कुलकडी इरिगेशन प्रकल्प (पुणे ), पेंच , (नागपूर), लोअर दुधाणा (परभणी), सिद्धेश्वर (हिंगोली), तिल्लारी (सिंधुदुर्ग), राधानगरीधरण, काळमावाडी (कोल्हापूर), इसापूर (यवतमाळ) या धरणावर सौरऊर्जा निर्मितीचा विचार सुरू आहे. या सर्व धरणांचीड सविस्तर माहिती संकलीत करण्याचे काम सुरू आहे. माहिती संकलनानंतर कोणत्या धरणांवर किती मेगावॅटचा प्रकल्प बसवावा याचा निर्णय घेतला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news