Gram Panchayat Scheme | ग्रामपंचायतींसाठी राज्य शासनाची मोठी घोषणा; जनसुविधा योजनेत ५ नव्या कामांचा समावेश

ग्रामीण भागातील विकासकामांना चालना देण्यासाठी राज्य शासनाने ग्रामपंचायतींसाठी महत्त्वाचा निर्णय
Maharashtra Rural Development Scheme
Maharashtra Rural Development SchemeAI Photo
Published on
Updated on

Maharashtra Rural Development Scheme

बांबवडे : ग्रामीण भागातील विकासकामांना चालना देण्यासाठी राज्य शासनाने ग्रामपंचायतींसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ग्रामविकास विभागाने २० जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, "ग्रामपंचायतीला जनसुविधांसाठी विशेष अनुदान" या जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत कामांची व्याप्ती वाढवून पाच नव्या विकासकामांचा समावेश करण्यात आला आहे.

या निर्णयामुळे गावांमध्ये पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यास मदत होणार असून विविध विकासकामांसाठी निधीचीही तरतूद करण्यात आली आहे.

Maharashtra Rural Development Scheme
kolhapur | मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘अजित स्मृती, अवीट स्मृती’ छायाचित्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन

योजनेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेली कामे व निधी मर्यादा :

सार्वजनिक दिवाबत्तीची सुविधा – कमाल १५ लाख रुपये

शासकीय कार्यालयांवर सोलर पॅनल बसविणे – कमाल २० लाख रुपये

वाचनालय इमारत बांधकाम – कमाल २० लाख रुपये

क्रीडांगण विकास – कमाल २० लाख रुपये

गावातील शासकीय जागांचे सौंदर्यीकरण – कमाल १५ लाख रुपये

शासनाने स्पष्ट केले आहे की, या योजनेत मंजूर होणारी कामे इतर कोणत्याही शासकीय योजनेतून दुबार मंजूर करता येणार नाहीत. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम होऊन गावांच्या सर्वांगीण विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news