Kolhapur News : महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिल निवडणूक प्रक्रिया सुरू; आजपासून अर्ज दाखल

एकूण 1 लाख 90 हजार मतदार; कोल्हापूर-5800, सांगली-4500, सातारा-3500 वकील हक्क बजावणार
 Maharashtra Assembly Polls
महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिल निवडणूक प्रक्रिया सुरूPudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिल निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. आज, शुक्रवार (दि.20) पासून उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. बार कौन्सिल सदस्य पदाच्या 25 जागांसाठी 24 मार्चला होणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्र-गोवा येथील 1 लाख 90 हजार वकील मतदानाचा हक्क बजावणार आहेत. बार कौन्सिलच्या निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून रस्सीखेच सुरू असून, दोन महिलांसह सहा ज्येष्ठ विधीतज्ञांची तयारी सुरू झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातून महाराष्ट्र- गोवा बार कौन्सिलसाठी विद्यमान सदस्य ॲड. विवेक घाटगे, कोल्हापूर जिल्हा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲड. रणजित गावडे, ॲड. अजितराव मोहिते, ॲड. सर्जेराव खोत, महिला प्रतिनिधीपदासाठी शैलजा चव्हाण व धनश्री चव्हाण इच्छुक आहेत. इच्छुकांनी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह राज्यातील तसेच गोवा येथील वकील मतदार यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यावर भर दिला आहे. महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून 5800, सांगली-4500, सातारा-3500, रत्नागिरी-1200, सिंधुदुर्ग-1400, सोलापूर-2800 सह दोन्ही राज्यांतील 1 लाख 90 हजार वकील मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मुंबईतील महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलच्या मुख्यालयात शुक्रवारपासून दि. 26 फेबुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news