

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे जागावाटपाचे मिटले असले तरी महायुतीच्या जागावाटपाचे घोंगडे अजून अडकले आहे. जागावाटपावरून महायुतीमध्ये नाट्यमय घडामोडी घडत असल्याने युतीमधील तणाव वाढत आहे. त्यामुळे महायुतीमधील वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला 74 व शिवसेना ठाकरे गटाला 7 जागा यावर एकमत झाले.
गेल्या पंधरा दिवसापासून महानगरपालिकेच्या जागा वाटपाबाबत सुरू असलेल्या चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. महाविकास आघाडीमधून शरद पवार राष्ट्रवादी बाहेर पडल्यामुळे काँग्रेस व शिवसेना यांच्यातील जागा वाटपावर रविवारी शिक्कामोर्तब झाला. काँग्रेसने 48 जागांची यादी दोन दिवसापुर्वीच जाहीर केली असून पंधरा उमेदवारांची यादी रविवारी जाहीर केली. शिवसेना ठाकरे गटानेही आपले उमेदवार जाहीर केले आहेत.महायुतीचे जागा वाटपाचा तिढा मात्र अजूनही कायम आहे. रविवारी दिवसभर चर्चेचा सिलसीला सुरू होता. सकाळी महायुतीमध्ये प्रमुख नेत्यांनी शिरोली येथे चर्चा केली. त्यानंतर रात्री उशिरा जिल्हा बँकेत त्यांची बैठक झाली. ही बैठक देखील बराचवेळ चालली परंतू या बैठकीतही जागा वाटपावर त्यांचे एकमत होऊ शकले नाही. उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी (दि.30) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत त्यांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा मात्र अजूनही कायम आहे. रविवारी दिवसभर चर्चेचा सिलसीला सुरू होता. सकाळी महायुतीमध्ये प्रमुख नेत्यांनी शिरोली येथे चर्चा केल्याचे समजते. त्यानंतर रात्री उशिरा जिल्हा बँकेत त्यांची बैठक झाली. ही बैठक देखील बराचवेळ चालली परंतू जागा वाटपावर त्यांचे एकमत होऊ शकले नाही. उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी (दि.30) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत त्यांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
प्रतिज्ञा उत्तुरे यांच्यासह ठाकरे सेनेचे सहा उमेदवार फायनल
कोल्हापूर ः महाविकास आघाडी अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाची काँग्रेसने अखेर सातच जागांवर बोळवण केली. डबल अंकी जागा द्या, अन्यथा स्वतंत्र लढू, असे म्हणणार्या ठाकरे सेनेतील पदाधिकार्यांनी जागावाटप मान्य केले. त्यानंतर कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख व माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांच्यासह सहा उमेदवारांवर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले.
महापालिकेच्या प्रभाग क्र. 7 - सर्वसाधारण प्रवर्गातून राजेंद्र जाधव, प्रभाग क्र. 7 - सर्वसाधारण महिला प्रवर्गातून सुप्रिया साळोखे, प्रभाग क्र. 10 - सर्वसाधारण प्रवर्गातून राहूल इंगवले, प्रभाग क्र. 11 - सर्वसाधारण प्रवर्गातून सचिन मांगले, प्रभाग क्र. 14 - सर्वसाधारण महिला प्रवर्गातून छाया पाटील, प्रभाग क्र. 15 - ओबीसी महिला प्रवर्गातून प्रतिज्ञा उत्तुरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. प्रभाग क्र. 10 - ओबीसी खुला प्रवर्गातून दोन इच्छुकांत मोठी रस्सीखेच सुरू असल्याने त्याचा निर्णय सोमवारी (दि. 29) घेण्यात येणार आहे. दरम्यान, काँग्रेसने प्रभाग क्र. 5 मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग ही जागा न सोडल्याने शहरप्रमुख सुनिल मोदी यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला.