Lumpy skin disease |कवठेगुलंदसह सात गावांत लम्पीचा शिरकाव; प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवण्याची मागणी!

Lumpy Outbreak
File Photo
Published on
Updated on

कवठेगुलंद : कवठेगुलंदसह , आलास, बुबनाळ, शेडशाळ, गौरवाड, औरवाड आणि गणेशवाडी या सात गावांमध्ये जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी पशुपालकांतून होत आहे.

बाधित अथवा संशयित जनावरांची तातडीने तपासणी करून त्यांना इतर जनावरांपासून वेगळे ठेवावे. संबंधित गावांमध्ये पशुवैद्यकीय पथकांमार्फत तपासणी, आवश्यक उपचार व लसीकरणाची मोहीम राबवावी. तसेच डास, गोचीड व इतर कीटकांपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी परिसरात स्वच्छता व कीटक नियंत्रणाची उपाययोजना करणे गरजेचे आहे.

लम्पीचा प्रादुर्भाव वाढल्यास पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने कवठेगुलंदसह आलास, बुबनाळ, शेडशाळ, गौरवाड, औरवाड व गणेशवाडी या सातही गावांमध्ये विशेष पशुवैद्यकीय शिबिरे आयोजित करावीत, अशी मागणी होत आहे.

जनावरांच्या अंगावर गाठी येणे, ताप येणे, भूक मंदावणे, नाक-डोळ्यातून स्राव येणे आदी लक्षणे दिसून आल्यास पशुपालकांनी विलंब न करता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे. लम्पीचा संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने केवळ कागदोपत्री उपाययोजना न करता प्रत्यक्ष गावपातळीवर मोहीम राबवावी, अशी अपेक्षा पशुपालकांतून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news