Kolhapur Crime News | अनैतिक संबंधातून महिलेवर प्राणघातक हल्ला; प्रियकरास जन्मठेप

Kolhapur Crime News |
Kolhapur Crime News | अनैतिक संबंधातून महिलेवर प्राणघातक हल्ला; प्रियकरास जन्मठेप
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : अनैतिक संबंधातून सोबत राहण्यास नकार दिल्याने ट्रकचालक प्रियकराने महिलेचे ट्रकमधून अपहरण करून तिच्यावर टॉमीने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी प्रियकरास शुक्रवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सिद्धेश्वर गणपती धोंड (वय ३६, रा. भंडारवाडी, धाराशीव) असे त्याचे नाव आहे. ३१ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी लक्ष्मी टेकडीजवळ ही घटना घडली होती.

ट्रकचालक सिद्धेश्वर धोंड याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. ३१ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी सिद्धेश्वरने महिलेस ट्रकमध्ये घेऊन 'तू पती, मुलांना सोडून माझ्यासोबत चल' असा तगादा लावला; मात्र यास संबंधित महिलेने नकार तिला. यातून चिडलेल्या सिद्धेश्वरने महिलेच्या तोंडावर, डोक्यावर ट्रकमधील टॉमीने जीवघेणा हल्ला केला. यामध्ये संबंधित महिला बेशुद्ध झाली.

तिला बेशुद्धावस्थेत लक्ष्मी टेकडी परिसरात फेकून देऊन तो पसार झाला. याप्रकरणी कागल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करून, त्याच्यावर दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश पाटील यांच्यासमोर झाली. जखमी महिला, पोलिस हवालदार रामचंद्र माळी, वैद्यकीय पुरावे, जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने सिद्धेश्वर धोंड याला जन्मठेप व ५० हजार रुपयांचा दंड सुनावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news