Love jihad Case | लव्ह जिहादप्रकरणी एसआयटी स्थापन

मोबाईलमधील व्हिडीओ, फोटोची फॉरेन्सिक तपासणी
love jihad
लव्ह जिहादAI Image
Published on
Updated on

कोल्हापूर : तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करत अश्लील व्हिडीओद्वारे बदनामी केल्याप्रकरणी कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला. लव्ह जिहादचा संशय असलेल्या या भयावहप्रकरणी अखेर एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन केल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी बुधवारी दिली. अपर पोलिस अधीक्षक धीरजकुमार यांच्या नेतृत्वाखाली आठ जणांचा यात समावेश आहे. दरम्यान, अटकेतील दोन्ही संशयितांना बुधवारी पेठवडगाव न्यायालयाने 4 मेपर्यंत पोलिस कोठडीत वाढ केली.

हातकणंगले पोलिस ठाण्यात शाहीद समीर सनदे (वय 22) व शाहरूख हुसेन देसाई (वय 30, दोघे रा. शिरोली पुलाची) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी आणखी एक युवती पुढे आली. तिने दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी पहाटे शाहीद सनदे याच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाची व्याप्ती वाढत चालल्याने एसआयटी स्थापन झाली. यामध्ये अपर पोलिस अधीक्षकांसह शहर उपअधीक्षक प्रिया पाटील, जयसिंगपूर उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्यासह दोन पोलिस निरीक्षक, महिला सहायक पोलिस निरीक्षक, महिला उपनिरीक्षक, सहायक पोलिस उपनिरीक्षक अशा आठ जणांचा समावेश आहे.

डिजिटल पुराव्यांची फॉरेन्सिक तपासणी; घरांची घेतली झडती

संशयितांच्या मोबाईमधील व्हिडीओ, फोटो यासह डिजिटल पुराव्यांची फॉरेन्सिक तपासणी सुरू झाली आहे. यासह अन्य उपकरणांमध्ये आक्षेपार्ह माहितीची साठवणूक केली आहे का, यासाठी दोघांच्या घरांची झडती घेण्यात आली.

दरम्यान, या आरोपींविरोधात भक्कम पुरावे गोळा करा, अशा सक्त सूचना पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी एसआयटीला दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news