Local body elections | मतदान केंद्र निश्चितीचे काम सुरू

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक तयारीला वेग
Local body election preparations
Local body elections | मतदान केंद्र निश्चितीचे काम सुरूPudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या मतदान केंद्र निश्चितीचे काम सुरू झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाने याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत, त्यानुसार मतदान केंद्रांची माहिती आयोगाला सादर केली जाणार आहे.

महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका घेण्याचे आदेश न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्याचा कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्याचीही सूचना देण्यात आली आहे. त्यानुसार पावसाळ्याचा कालावधी, उपलब्ध मनुष्यबळ यांचा विचार करून आयोगाकडून निवडणुकांची तयारी केली जात आहे, या तयारीला आता वेग आला आहे.

येत्या काही महिन्यांत होणार्‍या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रे निश्चित करून माहिती सादर करण्याचे आदेश आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. 700 ते 900 मतदारांसाठी एक याप्रमाणे मतदान केंद्र करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करून, मतदान केंद्रे तयार करण्याचे काम सुरू केले आहे.

700 ते 750 मतदार असलेली मतदान केंद्रे, 750 ते 800, 800 ते 850 आणि 850 ते 900 मतदार संख्या असलेली मतदान केंद्रांची माहिती संकलित केली जात आहे. त्यानंतर मतदान केंद्रे निश्चित करण्याबाबतचा अंतिम निर्णय होऊन मतदान केंद्रांची यादी राज्य निवडणूक आयोगाला सादर केली जाणार आहे.

राज्य निवडणूक आयुक्त आज घेणार आढावा

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सुरू असलेल्या तयारीचा राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे मंगळवारी (दि. 1) आढावा घेणार आहेत. या बैठकीसाठी ते कोल्हापूर दौर्‍यावर येत आहेत. सकाळी सव्वा सात वाजता त्यांचे कोल्हापूर रेल्वे स्थानकावर आगमन होईल. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीसह ते स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक कामकाजासह प्रामुख्याने इव्हीएमबाबत आढावा घेणार आहेत. रात्री नऊ वाजता ते रेल्वेने मुंबईला रवाना होणार आहेत.

आजअखेर झालेली तयारी

प्रभाग रचना, मतदार संघ निश्चितीची प्रक्रिया सुरू

उपलब्ध इव्हीएमची पडताळणी पूर्ण, माहिती सादर

आवश्यक, उपलब्ध अधिकार्‍यांची माहिती सादर

मतदान केंद्रे तयार करण्याचे काम सुरू

प्रभाग रचनेच्या कामाला गती

जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या प्रारूप मतदार संघ, महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कालबद्ध कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून तसेच महापालिका, नगरपालिका प्रशासनाकडून प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू असून, या कामाला आता गती आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news