Child Falls into Well | कोतोलीत विहिरीत पडून चिमुकलीचा मृत्यू

Child Falls into Well |
Child Falls into Well | कोतोलीत विहिरीत पडून चिमुकलीचा मृत्यू
Published on: 
Updated on: 

कोतोली : ऐन दिवाळीचा आनंदोत्सव सुरू असताना आणि फराळाची लगबग चालू असतानाच कोतोली (ता. पन्हाळा) येथील अवघ्या तीन वर्षांच्या चिऊ श्रीधर पाटील हिचा विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला.रविवारी दुपारी ही घटना घडली.

आई-वडील भात कापणीसाठी शेतात गेले होते. घरी चिऊला सांभाळण्यासाठी कोणी नसल्याने तिलाही सोबत नेण्यात आले होते. खेळता खेळता ती विहिरीजवळ पोहोचली आणि विहिरीत पडली. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु प्रकृती गंभीर असल्याने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सीपीआर येथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घरात सतत चिवचिव करणारी चिऊ काळाच्या पडद्याआड गेल्याने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तिच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे कोतोली परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.