Dr. Jayasingrao Pawar | इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचा जीवनपट

Dr. Jayasingrao Pawar |
Dr. Jayasingrao Pawar | इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचा जीवनपट
Published on
Updated on

जन्म : 30 डिसेंबर 1941 (तडसर, जि. सांगली)

शिक्षण : राजाराम कॉलेज, कोल्हापूर, एम. ए.

(1964)- विद्यापीठात पहिले, पीएच.डी. (1982), शिवाजी विद्यापीठ

संशोधन कारकिर्दीची सुरुवात : (1964 - 1969) : शिवाजी विद्यापीठाचे पाहिले कुलगुरू व थोर इतिहास संशोधक डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील मराठा इतिहास विभागात ऐतिहासिक कागदपत्रांच्या संशोधनाचा अनुभव

महाविद्यालयीन क्षेत्र : (1969 - 2001) : महाविद्यालयीन क्षेत्रात तीन दशकाहून अधिक काळ अध्यापन. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एम. ए.ची 20 क्रमिक पुस्तके

इतिहासविषयक / संशोधनपर लेखन : 45 इतिहासविषयक ग्रंथ : महाराणी ताराबाई, सेनापती संताजी घोरपडे, मराठेशाहीचा मागोवा, राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ आदी

इतिहास परिषदांची अध्यक्षस्थाने : मराठवाडा, नागपूर-अमरावती, खान्देश

महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी संस्थेची स्थापना : 1992. संस्थापक संचालक म्हणून कार्यरत

शिवाजी विद्यापीठ शाहू संशोधन केंद्र : संस्थचे 2007 पासून संचालक, महाराष्ट्राचा इतिहास, राजर्षी शाहू चरित्र व कोल्हापूरचा पंचखंडात्मक इतिहास ग्रंथांचे संपादन

राष्ट्रपतीच्या हस्ते सन्मान-2009 : राज्य सुवर्ण महोत्सवानिमित्त महाराष्ट्र

विधान मंडळातर्फे प्रकाशित ग्रंथ राजर्षी शाहू छत्रपती : जीवन व कार्य’ तीन भाषांतील ग्रंथाचे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते विमोचन, इतिहास-संशोधन क्षेत्रातील कार्याचा गौरव

डी. लिट. : डॉ. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, कोल्हापूर (2022)

प्रमुख ग्रंथ संपदा :

महाराणी ताराबाई, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसिंह नाना पाटील, सेनापती संताजी घोरपडे, राजर्षी शाहू - एक दृष्टिक्षेप, छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ, मराठे शाहीचा मागोवा, राजर्षी शाहू पंचखंडात्मक स्मारक ग्रंथ - (5 खंड), विजयी मराठाकार श्रीपतराव शिंदे, कोल्हापूर इतिहास दर्शन, स्वातंत्र्य सौदामिनी महाराणी ताराबाई (पहिले संशोधनात्मक चरित्र),दादाजी कोंडदेव कोण होता ?

व्यक्तिवेध : शरद पवार ते गोविंद पानसरे, पंचगंगेच्या तीरावरून (आत्मचारित्र),

रामदास स्वामी शिवछत्रपतींचे राजगुरू होते काय? (प्रेसमध्ये)

ग्रंथ व पुरस्कार :

मराठी साम्राज्याचा उदय व अस्त : सर्वोत्कृष्ट ग्रंथ - 1973, शिवाजी विद्यापीठ

महाराणा ताराबाई : सर्वोत्कृष्ट ग्रंथ - राज्य पुरस्कार, महाराष्ट्र शासन, मुंबई - 1975-76

सेनापती संताजी घोरपडे : सर्वोत्कृष्ट इतिहास ग्रंथ म्हणून म. म. दत्तो वामन पोतदार पुरस्कार, मराठी साहित्य परिषद, पुणे- 1987

राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ : राजर्षीं शाहू ग्रंथ पुरस्कार - राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्ट -2005

शिवपुत्र छत्रपती राजाराम : सर्वोत्कृष्ट ग्रंथ- राज्य पुरस्कार, महाराष्ट्र शासन, मुंबई - 2019

साहित्यिक व सामाजिक गौरव पुरस्कार :

जिजामाता विद्वतगौरव पुरस्कार, नागपूर, धन्वतंरी गौरव पुरस्कार, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठ - गुणवंत शिक्षक पुरस्कार, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार, वाई

बसव पुरस्कार, कोल्हापूर, कोल्हापूर भूषण पुरस्कार

फुले - आंबेडकर साहित्य पुरस्कार, सातारा. आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार, बेळगाव.

ब्रँड कोल्हापूर पुरस्कार, भाई वैद्य स्मृती पुरस्कार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news