कासारवाडीत बिबट्याचा वावर, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

वाग्जाईचे माळ येथे आढळून आले बिबट्याच्या पायाचे ठसे
Leopard sighting in Kasarwadi, fear among farmers
कासारवाडीत बिबट्याचा वावर, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण Pudhari Photo
Published on
Updated on

कासारवाडी : पुढारी वृत्तसेवा

येथील वाग्जाईचे माळ परिसरातील शेतातून मेंढपाळाचे कुत्रे बिबट्याने पळवल्याची घटना समोर आली आहे. यावेळी बाजूच्या परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळल्याने या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे शेतकऱ्यांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाग्जाई मंदिराच्या पुर्वेकडील बाजूस मेंढपाळांची शेड आहे. येथे पावसाळ्यामुळे मेंढ्या व आनंदा गांजले, दिपक गांजणे वस्तीला असतात. मेंढ्यांच्या रक्षणासाठी दोन कुत्री आहेत. रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास जोरजोराने कुत्रे भुंकण्याचा आवाज आला. थोड्या वेळात एक कुत्रा नाहीसा झाला. त्यांनी प्राणीमित्र प्रदीप वागवे यांना बोलावून पाहणी केली. यावेळी तेथे बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. या ठशांचे छायाचित्र काढून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठवले असता ते ठसे बिबट्याचेच असल्याचा दुजोरा वन विभागाच्यावतीने देण्यात आला.

दरम्यानच्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर पर्यटकांच्या निदर्शनास आल्याचे समजते. पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी शेतात जातात. तसेच या परिसरात पाळीव जनावरे चरण्यासाठी असतात. दरम्यान हे ठसे बिबट्याचे असून या परिसरातील शेतकर्‍यांनी खबरदारीचा उपाय म्हणून एकट्याने शेतात जाऊ नये असे आवाहन वन्यजीव पथक सदस्य व प्राणी अभ्यासक अमोल चव्हाण यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news