Leopard Sighting News | सरूड - शिंपेदरम्यान बिबट्याचे दर्शन

भीतीचे वातावरण; वन विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी
leopard sighting during sarud shimped tour
सरूड-शिंपेदरम्यान वारणा कालवा परिसरात वन विभागाच्या पथकाला बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले.Pudhari File Photo
Published on
Updated on

सरूड : शाहूवाडी तालुक्यातील सरूड-शिंपे गावादरम्यान शिंपे गावच्या हद्दीत बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात वन विभागाच्या पथकाला बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आल्यामुळे बिबट्याचा वावर निश्चित झाला आहे. बिबट्याचा वन विभागाने त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सरूड ते शिंपेदरम्यान उजवा कालवा आहे. या कालव्याच्या पश्चिमेला गुरुवारी (दि.2) रात्री 8 च्या सुमारास राजाराम पाटील या वाहनचालकाला शिंपेकडे जात असताना बिबट्याचे दर्शन झाले. दरम्यान, शुक्रवारी वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी केलेल्या पाहणीत बिबट्याचे चिखलातील ठसे आढळून आले. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी परिसरात एकट्याने फिरू नये, मोबाईलवर गाणी अथवा मोठमोठ्या आवाजात संवाद करावा, असे सावधानतेचे आवाहन परिसरातील रहिवाशी, नागरिकांना वन विभागाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news