Leopard In kolhapur | बापरे! बोळावी गावात बिबट्याचा वावर; स्मशान रोडवरील झुडपात दर्शन झाल्याने ग्रामस्थांची भंबेरी उडाली

Leopard In kolhapur | कागल तालुक्यातील बोळावी गावात बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
Leopard News
प्रातिनिधिक छायाचित्र File Photo
Published on
Updated on

मुरगूड : पुढारी वृत्तसेवा

कागल तालुक्यातील बोळावी गावात बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. स्मशान रोड परिसरात निर्जन आणि अंधाऱ्या भागातील झुडपांमध्ये बिबट्या बसलेला असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leopard News
Kolhapur Zilla Parishad: कोल्हापूर जिल्ह्यावर वर्चस्वासाठी भाजपची आक्रमक चाल

रविवारी पहाटे अंधारात झुडपांमधून चमकणारे डोळे दिसल्याने ग्रामस्थांचे लक्ष त्या दिशेने गेले. जवळ जाऊन पाहिले असता तो बिबट्या असल्याचे लक्षात येताच एकच घाबरगुंडी उडाली. त्यानंतर गावकऱ्यांनी तत्काळ सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली असून सध्या संपूर्ण गाव भयभीत वातावरणात वावरत आहे.

सह्याद्रीच्या जंगलातील बिबटे मानवी वस्तीत शिरकाव करू लागले आहेत की काय, अशी शंका ग्रामस्थांमध्ये व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Leopard News
Shraddha Kapoor Kolhapur |'ईठा'चे शूटिंग, श्रद्धा कपूर अंबाबाईच्या चरणी, चाहत्यांची प्रचंड गर्दी

बोळावी गावाला वन्यप्राण्यांचा धोका नेहमीच असतो. मात्र या बाबीकडे वनविभागाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे.

बिबट्या थेट गावाच्या वस्तीजवळ आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वी वनविभागाने तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news