Leopard attack: पन्हाळ्याजवळ तरुणावर बिबट्याचा हल्ला

सातवे पैकी शिंदेवाडी (ता. पन्हाळा) येथे मका पिकाची पाहणी करण्यासाठी शेतात गेलेल्या तरुणावर बिबट्याने हल्ला केला
Leopard attack
Leopard attackPudhari
Published on
Updated on

कोल्हापूर : सातवे पैकी शिंदेवाडी (ता. पन्हाळा) येथे मका पिकाची पाहणी करण्यासाठी शेतात गेलेल्या तरुणावर बिबट्याने हल्ला केला. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास झालेल्या या घटनेत रितेश जयवंत शिंदे (22) हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.

शेतात पिकाची पाहणी करत असताना अचानक समोर आलेल्या बिबट्याने रितेशवर झडप घातली. त्याच्या चेहऱ्यावर पंजाने फटका मारला. त्यात रितेशला कानाजवळ गंभीर जखम झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने रितेश जागेवर कोसळला. त्याला ग््राामस्थानी उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. दरम्यान वनरक्षक संदीप पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाकडून परिसरात बिबट्याचा शोध सुरू केला. या प्रकाराने शिंदेवाडीसह परिसरात शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news