‘अमेरिका-इराण युद्ध : सद्य:स्थिती आणि जागतिक परिणाम’ यावर प्रा. डॉ. विजय खरे यांचे व्याख्यान

‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव व्याख्यानमाला
‘अमेरिका-इराण युद्ध : सद्य:स्थिती आणि जागतिक परिणाम’ यावर प्रा. डॉ. विजय खरे यांचे व्याख्यान
‘अमेरिका-इराण युद्ध : सद्य:स्थिती आणि जागतिक परिणाम’ यावर प्रा. डॉ. विजय खरे यांचे व्याख्यान
Published on
Updated on

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव स्मृती व्याख्यानमालेत सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठातील प्रा. डॉ. विजय खरे यांचे ‘अमेरिका-इराण युद्ध : सद्य:स्थिती आणि जागतिक परिणाम’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. बुधवारी (दि. 20) सायंकाळी 5 वाजता गोविंदराव टेंबे रंगमंदिर, गायन समाज देवल क्लब येथे हे व्याख्यान होणार आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी डॉ. ग. गो. जाधव स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. गेल्या 38 वर्षांपासून सुरू असलेल्या व्याख्यानमालेत यावर्षी डॉ. खरे 36 वे पुष्प गुंफणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी असणार आहेत. प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांची प्रमुख उपस्थिती असेल. इराण-अमेरिका सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर डॉ. खरे आपल्या खास शैलीत ‘अमेरिका-इराण युद्ध : सद्य:स्थिती आणि जागतिक परिणाम’ या विषयावर मांडणी करणार आहेत.

डॉ. खरे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संरक्षण व सामरिक अभ्यास विभागाचे (डीडीएसएस) वरिष्ठ प्राध्यापक, विभागप्रमुख आणि मानव विद्याशाखेचे अधिष्ठाता आहेत. त्यांना वॉशिंग्टन डी.सी. (अमेरिका) येथील प्रतिष्ठित फुलब—ाईट फेलोशिप मिळाली आहे. तसेच युरोपियन कमिशनतर्फे मासारिक विद्यापीठ, झेक प्रजासत्ताक येथे इरास्मस फेलोशिप व संयुक्त राष्ट्र विद्यापीठ टोकियो, जपान येथे आंशिक फेलोशिप मिळाली आहे. डॉ. खरे यांची ‘होलोग्रामॅटिक दहशतवाद’ या विषयावरील संयुक्त राष्ट्रांच्या लघु अभ्यासक्रमासाठी निवड झाली होती. तो संयुक्त राष्ट्र, आंतर प्रादेशिक गुन्हे आणि न्याय संशोधन संस्था, रोम विद्यापीठ, इटली येथे आयोजित करण्यात आला होता. लंडन विद्यापीठ, यूके येथे कार्यकारी नेतृत्व कार्यक्रम व प्रगत मध्यस्थी व शांतता प्रस्थापित करण्याचा कार्यक्रम त्यांनी पूर्ण केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news