राहुल गांधी कोल्हापुरात दाखल, काँग्रेस नेत्यांनी केले स्वागत

Rahul Gandhi Kolhapur Visit | राहुल गांधी यांचा कोल्हापूर दौरा सुरु
Rahul Gandhi Kolhapur Visit
कोल्हापूर- राहुल गांधी यांचे आज शनिवारी येथील विमानतळावर काँग्रेस नेत्यांनी स्वागत केले. (Image source-Satej Patil X account)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते, खासदार राहुल गांधी आज शनिवारी (दि.५) सकाळी कोल्हापुरात (Rahul Gandhi Kolhapur Visit) दाखल झाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, विधान परिषद सदस्य सतेज पाटील यांच्यासह प्रदेश काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी राहुल गांधी यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत केले.

शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने शुक्रवारचा त्यांचा दौरा रद्द झाला होता. ते आज शनिवारी (दि.५) सकाळी कोल्हापुरात दाखल झाले. कसबा बावडा येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते शनिवारी सकाळी १० वाजता होणार आहे. आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून हा बहुशस्त्रधारी भव्य पुतळा साकारला आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांचे शनिवारी सकाळी विमानाने कोल्हापुरात आगमन झाले. तेथून ते कसबा बावड्याकडे रवाना झाले. भगवा चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानतंर शाहू समाधी स्थळास भेट देऊन ते अभिवादन करतील.

Rahul Gandhi Kolhapur Visit
कसबा बावडा येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे आज अनावरण

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news