Ganesh Festival | लेझर, सीओटू स्मोकरवर गणेश मिरवणुकीत बंदीच; ‘दोन बेस, दोन टॉप’लाच परवानगी

पोलिस प्रशासनाच्या व्यावसायिकांना सूचना
Ganesh Festival |
Ganesh Festival | लेझर, सीओटू स्मोकरवर गणेश मिरवणुकीत बंदीच; ‘दोन बेस, दोन टॉप’लाच परवानगी
Published on
Updated on

कोल्हापूर : डोळ्यास अपायकारक लेझरसह कार्बन डाय ऑक्साईड (सीओटू) स्मोकरला गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीत बंदी घालण्यात येणार आहे. वापर केल्यास मंडळासह मालकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी दिला.

गुरुवारी शाहू स्मारक भवन येथे पोलिस प्रशासन व साऊंड, लाईट, मंडप व्यावसायिकांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. गणेश उत्सवाच्या आगमन व विसर्जन मिरवणुकीत दोन बेस दोन टॉपलाच परवानगी देण्यात येणार असून न्यायालयाच्या आवाज मर्यादेचे पालन करणे बंधनकारक आहे. आवाज मर्यादेचे उल्लंघन केल्यास संबंधित मंडळासह साऊंड व्यावसायिक, चालकांवरही गुन्हे दाखल करण्यात येतील. आगमन व विसर्जन मिरवणुकीत अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी प्रशासन सज्‍ज असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

गणेशोत्सवात ‘दोन बेस, दोन टॉप’लाच परवानगी

कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या आगमन व विसर्जन मिरवणुकीत दोन बेस, दोन टॉपलाच परवानगी देण्यात येत आहे. याचसोबत डोळ्यांना इजा पोहोचविणाऱ्या लेसरला, तसेच कार्बन डायऑक्साईडचा वापर करून उडविल्या जाणाऱ्या स्मोकरलाही यंदा मिरवणुकीत बंदी असणार आहे. याचा वापर केल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी दिला.

गुरुवारी शाहू स्मारक भवन येथे पोलिस प्रशासन व साऊंड, लाईट, मंडप व्यावसायिकांची बैठक पार पडली. बैठकीला पोलिस निरीक्षक संतोष डोके, विकास जाधव, श्रीराम कनेरकर उपस्थित होते. पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी न्यायालयाच्या आवाज मर्यादेचे पालन करणे बंधनकारक आहे. यामुळे मंडळाचे कार्यकर्ते आवाज वाढविण्यासाठी गळ घालत असतील, तर साऊंड ऑपरेटरनी त्यास नकार देणे गरजेचे आहे. काही ऑपरेटर मद्य प्राशन करून नियमांचे उल्लंघन करताना दिसतात, त्यांच्यावर थेट कारवाई केली जाईल. आवाज मर्यादेचे उल्लंघन केल्यास संबंधित मंडळासह साऊंड व्यावसायिक, चालक यांच्यावरही गुन्हे दाखल होतील, असा इशाराही पाटील यांनी दिला.

आरोग्यास घातक लेसर, स्मोकर्सना बंदीच

गतवर्षी आगमन, विसर्जन मिरवणुकीत लेसरच्या वापराने अनेक भाविकांच्या डोळ्यांना इजा झाली होती. तसेच, मोबाईलही खराब झाले होते. लहान मुले, वयोवृद्ध नागरिकांना स्मोकरमुळे त्रास होतो, त्यामुळे या दोन्‍हीलाही बंदी घालण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने याबाबतचा आदेश लागू केला जाणार आहे.

‘या’ आहेत सूचना

डोळ्यांना अपायकारक लेसरवर बंदी श्वसनास त्रासदायक स्मोकरवर निर्बंध मिरवणुकीत सहभागी ट्रॅक्टर, ट्रॉलीसह इतर वाहनांचे फिटनेस आवश्यक स्ट्रक्चर मर्यादेचे पालन बाहेरील साऊंडला बंदी मिक्सर, प्रेशर मिडवर बंदी आवाज मर्यादेसह वेळेचे पालन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news