Kurundwad API Santosh Mane | कुरुंदवाडचे सपोनि संतोष माने यांची तडकाफडकी बदली

मोर्चातील हलगर्जीपणाचा फटका; डोईजड रुजू
Kurundwad API Santosh Mane |
Kurundwad API Santosh Mane | कुरुंदवाडचे सपोनि संतोष माने यांची तडकाफडकी बदली
Published on
Updated on

नृसिंहवाडी : कुरुंदवाडचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने यांची तडकाफडकी बदली केली आहे. सैनिक टाकळी येथील प्रस्तावित एमआयडीसीला विरोधासाठी जयसिंगपुरात काढलेल्या मोर्चाच्या बंदोबस्तात हलगर्जीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे. तणावावेळी बंदोबस्तावर हजर राहण्याऐवजी ते केवळ वाहनातच बसून राहिल्याचे उघडकीस आले आहे. या बेजबाबदार वर्तनाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून त्यांच्या जागी शाहूवाडीचे शीतलकुमार डोईजड यांनी पदभार स्वीकारला आहे.

जयसिंगपूरमध्ये मोर्चाचे आयोजन केलेे होते. मगदूम कॉलेजपासून पुढे बॅरिकेड्स लावलेले होते. अमगोंडा पाटील कमानीकडे मोर्चा जात होता. मोठा पोलीस फौजफाटा तैनात होता. या बंदोबस्ताची जबाबदारी कुरुंदवाडचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्यावरही सोपवली होती; मात्र तणावाच्या स्थितीत कर्तव्यावर सक्रिय राहण्याऐवजी माने हे पोलिसांच्या वाहनातच बसून राहिल्याचे निदर्शनास आले. या गंभीर प्रकाराची नोंद जयसिंगपूरचे उपविभागीय पोलीस अधीक्षक अमोल ठाकूर यांनी घेतली. त्याच ठिकाणी ठाकूर यांनी माने यांना लोकांना रोखण्याचे सोडून गाडीत बसून काय करताय, असा सवाल विचारत खडे बोल सुनावले. त्यानंतर माने तातडीने गाडीतून उतरून मोर्चा रोखण्यासाठी गेले. वरिष्ठांनी माने यांच्यावर तातडीने बदलीची कारवाई केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news