कोल्हापूरच्या सायकलपटूंची ‘पुढारी’ने उभारलेल्या सियाचीन हॉस्पिटलला भेट

इंधन बचतीचा संदेश देण्याच्या उद्देशाने या मोहिमेचे आयोजन
Kolhapur's cyclists visit the Siachen Hospital set up by 'Pudhari'
कोल्हापूर : येथील हौशी सायकलपटू पाच मित्रांनी हिमालयातील सायकल मोहीम यशस्वी केली. मोहिमेदरम्यान दै. ‘पुढारी’ने भारतीय जवानांसाठी उभारलेल्या सियाचीन येथील हॉस्पिटलला आवर्जून भेट दिली. Pudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : हिमालयातील उंच डोंगर रांगातील चढ-उतारांचे रस्ते, घाटातील जीवघेणी वळणे, रक्त गोठवणारी थंंडी, ऑक्सिजनची कमतरता, सोसाट्याचा वारा असा प्रतिकूल प्रवास करून कोल्हापुरातील सायकलपटूंनी दै. ‘पुढारी’ने उभारलेल्या सियाचीन हॉस्पिटलला भेट दिली.

पर्यावरण रक्षण जागृती, सायकल वापरातून इंधन बचतीचा संदेश देण्याच्या उद्देशाने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यात कोल्हापूरच्या पाच मित्रांचा समावेश होता. 8 ते 25 जुलै असा सुमारे 20 दिवसांचा हा प्रवास होता. सायकलपटू अभिजित धामणे (वय 46), डॉ. प्रदीप कुलकर्णी (वय 67), बंडोपंत चव्हाण (वय 45), रमेश मेणकर (वय 52), डॉ. शहाजीराव चव्हाण (वय 62) यांनी ही मोहीम फत्ते केली.

पर्यावरणपूरक व आरोग्यवर्धक मोहिमेसोबतच पर्यटन आणि धार्मिक सहलीचे आयोजन करण्यात आले. यात सियाचीन येथील वॉर मेमोरिअल, रोझिंगला व कारगिल वॉर मेमोरियल, सियाचीन बेस कॅम्प, कोल्हापूरच्या दै. ‘पुढारी’ने उभारलेले सियाचीन मिलिटरी हॉस्पिटल, श्रीनगर येथील दाल लेक, ऐतिहासिक लाल चौक यासह मणीकरण महादेव मंदिर, वशिष्ठ ऋषी व हिडिंबा मंदिर, अमरनाथ यात्रा यांचा समावेश होता. मनाली ते लेह, खरदुंगला पास, रेझिंगला पास, डमलिंगला पास (जगातील सर्वात उंचीवरील रस्ता 19 हजार 24 फूट), लडाख, हिमाचल, जम्मू-काश्मीर अशा ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीतून प्रवास करण्यात आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news