Kolhapuri Chappals Blend | कोल्हापुरी चप्पल कस्सं? तुम्ही म्हणाल तस्सं..!

परंपरेला आधुनिकतेची जोड; ग्राहकांच्या अपेक्षांनुसार होताहेत बदल
Kolhapuri Chappals Blend |
Kolhapuri Chappals Blend | कोल्हापुरी चप्पल कस्सं? तुम्ही म्हणाल तस्सं..!
Published on
Updated on

अनुराधा कदम

कोल्हापूर : कोल्हापुरी चप्पल सुंदर आहे; पण सुरुवातीला इजा करते..., रंग, पॉलिशमुळे त्वचेला त्रास होतो..., पावसात किंवा गुळगुळीत फरशीवर घसरते... अशा तक्रारी गेल्या वर्षांपासून ग्राहकांकडून होत होत्या. तरुणाईला ‘कोल्हापुरी’चा बाज आवडतो; पण डिझाईन नव्या ट्रेंडच्या हव्या असल्याच्याही प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या. त्यामुळे ग्राहकांच्या मागणीनुसार ‘कोल्हापुरी चप्पल कस्सं? तुम्ही म्हणाल तस्सं’ म्हणत परंपरागत हस्तकलेचा आत्मा जपून कारागिरांनी आधुनिक फॅशन, आरामदायी वापर आणि ग्राहकांच्या अपेक्षा यांचा सुंदर मेळ घातला आहे.

तरुणाईकडून खास मागणी

एकेकाळी केवळ पारंपरिक पोशाखाची ओळख असलेली कोल्हापुरी चप्पल आता जीन्स, ट्राऊझर्स, इंडो-वेस्टर्न आणि कॅज्युअल वेअरसोबतही सहज शोभेल अशा डिझाईनमध्ये तयार केली जात आहे. तरुणाईची आवड लक्षात घेऊन रंगसंगती, नक्षीकाम, बांधणी आणि फिनिशिंगमध्ये अनेक प्रयोग केले जात आहेत. कोल्हापुरी चप्पलला भारताबरोबरच चीन, जपान, फ्रान्स, लंडन, अमेरिका, दुबई आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्येही मागणी आहे.

‘कोल्हापुरी’चं नवं रूप

आरामदायी बांधणी : नवीन चप्पल पायाला लागू नये म्हणून कुशन प्रक्रिया

अँटिस्लिप तळवा : गुळगुळीत फरशीवरही चांगली पकड मिळावी, यासाठी सुधारित सोल

त्वचेसाठी सुरक्षित : रासायनिक पॉलिशऐवजी नैसर्गिक, पर्यावरणपूरक रंगांचा वापर

तरुणाईला साजेशी फॅशन : पारंपरिक डिझाईनसोबत आधुनिक रंग, पॅटर्न आणि स्टाईल

दैनंदिन वापरासाठी योग्य : केवळ सण-समारंभापुरती नव्हे, तर रोज वापरता येईल अशी निर्मिती

चप्पल केवळ सण-समारंभापुरती नव्हे, तर रोज आत्मविश्वासाने वापरावी, यासाठी ग्राहकांच्या प्रत्येक सूचनेचा अभ्यास करून कोल्हापुरी चप्पल अधिक आरामदायी, सुरक्षित आणि आधुनिक बनवत आहोत. परंपरा कायम ठेवत काळानुसार बदल स्वीकारल्याशिवाय ही कला पुढे जाऊ शकत नाही.

गिरीश गवंडी, चप्पल व्यावसायिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news