Kolhapur ZP: मनपाप्रमाणेच ‌‘झेडपी‌’त पदांचा फॉर्म्युला

अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचाच : उपाध्यक्षपदासाठी भाजप, शिवसेना आग्रही
Kolhapur ZP
Kolhapur ZP Pudhari
Published on
Updated on
विकास कांबळे

कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक झाल्यानंतर स्वतंत्रपणे लढलेल्या महायुतीतील घटक पक्षांची एकत्र बैठक घेण्यासाठी चर्चा सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेतील पदांबाबत महानगरपालिकेत जो फॉर्म्युला वापरण्यात येत आहे, तोच जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीत निश्चित करण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच राहणार आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा धुरळा खाली बसत असतानाच आता सत्तास्थापनेकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढलेल्या महायुतीतील घटक पक्षांची एकत्र बैठक घेण्याबाबत चर्चा सुरू झाली असून, पदवाटपासाठी महानगरपालिकेत वापरलेला ‌‘जास्त जागा-जास्त पद‌’ हा फॉर्म्युला जिल्हा परिषदेतही लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहणार आहे.

महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला तुलनेने जास्त जागा मिळाल्यामुळे पदाधिकारी चर्चेत राष्ट्रवादी काँग््रेासला फारसे महत्त्व मिळाले नव्हते. जागावाटप आणि पदाधिकारी निवडीबाबत भाजप-शिवसेना नेतेच आघाडीवर होते. मात्र, जिल्हा परिषदेत चित्र उलट आहे. येथे राष्ट्रवादी काँग््रेास सर्वाधिक जागा मिळवून पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरल्याने पदवाटपाच्या चर्चेत भाजप आणि शिवसेनेला आता राष्ट्रवादीची वाट पहावी लागणार आहे.

जिल्हा परिषदेत साधारणपणे दहा समित्या असतात. त्यापैकी स्थायी समिती व जलव्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद जिल्हा परिषद अध्यक्षांकडेच असते. उर्वरित आठ समित्यांमध्ये उपाध्यक्षपदासोबत कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापतिपद दिले जाते, तर बांधकाम-आरोग्य, समाजकल्याण, शिक्षण आणि महिला व बालकल्याण अशा महत्त्वाच्या समित्यांसाठी स्वतंत्र सभापतींची निवड केली जाते. या पदवाटपावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहेत.

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेची समीकरणे जुळवताना प्रत्येक पक्ष आपले राजकीय वर्चस्व टिकवण्याच्या प्रयत्नात आहे. महानगरपालिकेत दुय्यम ठरलेली राष्ट्रवादी काँग््रेास जिल्हा परिषदेत मात्र एक नंबरची ठरली आहे. भाजप व शिवसेना उपाध्यक्षपद, सभापतिपद व महत्त्वाच्या समित्यांवर दावा करण्याची शक्यता आहेत. लवकरच यासंदर्भात अधिकृत बैठक घेऊन पदांबाबत चर्चा होणार आहे.

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेची समीकरणे जुळवताना प्रत्येक पक्ष आपले राजकीय वर्चस्व टिकवण्याच्या प्रयत्नात आहे. महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग््रेासला तुलनेने कमी जागा मिळाल्यामुळे त्यांना अपेक्षित स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे जिल्हा परिषदेत मिळालेल्या संख्याबळाच्या जोरावर राष्ट्रवादी अधिक आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news