kolhapur | मंत्री,पदाधिकार्‍यांनी घेतले मनावर; काटकसर सुरू

अध्यक्षा जनता गाडीतून, उपाध्यक्ष-सभापती इलेक्ट्रिक बाईकवरून; प्रत्येक शुक्रवारी राबविणार विशेष उपक्रम
कोल्हापूर ः इंधन बचतीसाठी जनता गाडीतून प्रवास करताना शिक्षण सभापती शीतल यादव आणि शिक्षणाधिकारी मीना शेंडकर. दुसर्‍या छायाचित्रात जनता गाडीतील प्रवाशांसोबत चर्चा करताना जि.प. अध्यक्षा शिल्पा खोत.
कोल्हापूर ः इंधन बचतीसाठी जनता गाडीतून प्रवास करताना शिक्षण सभापती शीतल यादव आणि शिक्षणाधिकारी मीना शेंडकर. दुसर्‍या छायाचित्रात जनता गाडीतील प्रवाशांसोबत चर्चा करताना जि.प. अध्यक्षा शिल्पा खोत. (छाया ः पप्पू अत्तार)
Published on
Updated on

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत कोल्हापूर जिल्हा परिषद पदाधिकारी आणि अधिकार्‍यांनी शुक्रवारी अनोखा उपक्रम राबविला. जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत यांनी कागल-कोल्हापूर जनता गाडीतून प्रवास करत जिल्हा परिषद गाठली, तर उपाध्यक्ष तानाजी पाटील आणि आरोग्य सभापती सारिका नांदेकर यांनी इलेक्ट्रिक बाईकचा वापर करून इंधन बचतीचा संदेश दिला.

जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत या कागलहून जनता गाडीतून दसरा चौकापर्यंत आल्या. तेथून त्यांनी अ‍ॅटो रिक्षाने जिल्हा परिषदेपर्यंतचा प्रवास केला. शिक्षण समिती सभापती शीतल यादव आणि शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनीही बसने प्रवास केला. बांधकाम व आरोग्य सभापती सारिका नांदेकर यांनी इलेक्ट्रिक बाईकवरून हजेरी लावली.

उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी गडमुडशिंगी (ता. करवीर) येथून नागाळा पार्कस्थित जिल्हा परिषद मुख्यालयापर्यंत इलेक्ट्रिक बाईकवरून प्रवास केला. सुमारे आठ किलोमीटरचा हा प्रवास त्यांनी ये-जा असा पूर्ण केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news