Kolhapur Zilla Parishad | जि.प. सभापती निवडी बिनविरोध

Kolhapur Zilla Parishad
Kolhapur Zilla Parishad | जि.प. सभापती निवडी बिनविरोध
Published on
Updated on

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या विविध सभापती पदांच्या निवडी सोमवारी बिनविरोध पार पडल्या. सकाळपासून सुरू असलेल्या राजकीय हालचालींनंतर दुपारपर्यंत सर्व पदांवर एकमत झाल्याने निवड प्रक्रिया पार पडली. अध्यक्षस्थानी मोसमी चौगुले होत्या. अर्थ व शिक्षण सभापतिपदी जनसुराज्य पक्षाच्या शीतल यादव, बांधकाम व आरोग्य सभापतिपदी शिवसेनेच्या सारिका नांदेकर, महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी राष्ट्रवादीच्या विद्या पाटील, तर समाजकल्याण समितीच्या सभापतीपदी शाहू आघाडीच्या श्रद्धा गायकवाड यांची निवड झाली.

निवडीनंतर जिल्हा परिषद परिसरात समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला. जि.प. अध्यक्षा शिल्पा खोत व उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी नूतन सभापतींचा सत्कार केला. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांचीही यावेळी उपस्थिती होती. सकाळी 10 ते 12 या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. दुपारी 2 वाजता सभेच्या कामकाजास सुरुवात झाली. माघारीच्या मुदतीत अर्ज मागे घेतल्याने निवडणूक टळली. यापूर्वी सकाळपासून हॉटेल अयोध्या व हॉटेल पॅव्हेलियन येथे प्रमुख नेत्यांच्या बैठका होऊन सभापती पदांची नावे निश्चित करण्यात आली होती. निवडीनंतर गोकुळचे चेअरमन नाविद मुश्रीफ, राष्ट्रवादीचे राहुल पाटील, अर्जुन आबिटकर, संजय पाटील यड्रावकर तसेच जनसुराज्यचे समित कदम आदींनी नूतन पदाधिकार्‍यांचे अभिनंदन केले.

पदवाटप फॉर्म्युल्यानुसार निवड प्रक्रिया

जि.प.मध्ये महायुतीचे वर्चस्व असल्याने गेल्या आठवड्यातच पदवाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी अधिकृत निवड प्रक्रिया पार पडली. काँग्रेसकडून काही पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र राष्ट्रवादीचे गटनेते सुधीर देसाई यांनी एकमताचा आग्रह धरत काँग्रेसला माघार घेण्याची विनंती केली. काँग्रेस गटनेते एकनाथ पाटील यांनी पक्षनेते आ. सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार माघार जाहीर केल्याने सर्व निवडी बिनविरोध झाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news