Kolhapur Zilla Parishad | कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड आज

अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे; नाव बंद पाकिटातून जाहीर होणार
Kolhapur Zilla Parishad
Kolhapur Zilla Parishad | कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड आज
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी मंगळवारी (दि. 17) विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. याआधी सकाळी 10 ते 12 या वेळेत दोन्ही पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. दुपारी 2 वाजता जिल्हा परिषदेच्या राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात निवडीची सभा होणार आहे.

जिल्हा परिषदेत महायुतीचे स्पष्ट बहुमत असल्याने अध्यक्षपद महायुतीतील मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे सव्वा वर्षासाठी जाणार आहे. या पदासाठी शोभाताई फराकटे, पूजा पाटील, शिल्पा खोत आणि शैलजा पाटील यांची नावे चर्चेत आहेत. उमेदवाराचे नाव पक्षनेतृत्वाकडून बंद पाकिटातून येणार आहे.

उपाध्यक्षपद भाजपकडे जाण्याची शक्यता असून, या पदासाठी तानाजी पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. भाजपकडूनही उमेदवाराचे नाव बंद पाकिटातूनच जाहीर होणार आहे. दरम्यान, सोमवारी रात्री महायुतीचे सर्व सदस्य पन्हाळ्यावर एकत्र जमले. मंगळवारी सकाळी विशेष बसने त्यांना जिल्हा परिषदेकडे आणले जाणार आहे.

जिल्हा परिषदेत 68 पैकी महायुतीकडे 52 जागा आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे 20, भाजपचे 12, शिवसेनेचे 9, जनसुराज्यचे 6 आणि आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या आघाडीच्या 4 जागांचा समावेश आहे. विरोधातील काँग्रेसकडे 15 जागा आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद सत्तेवर महायुतीचेच वर्चस्व कायम राहण्याची शक्यता आहे. महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सायंकाळी विमानतळावर घेतली. या बैठकीत राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि जनसुराज्य या चारही पक्षांना सव्वा वर्षासाठी अध्यक्षपद देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पहिला कार्यकाळ राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार आहे

‘गोकुळ’ निवडणुकीचे सावट

पदाधिकारी निवडीवर आगामी ‘गोकुळ’ निवडणुकीचेही सावट आहे. काही इच्छुक उमेदवारांकडून पदाधिकारी निवडीतून ‘गोकुळ’ निवडणुकीसाठी आपला मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news