Kolhapur Youth Death | अब्दुललाट येथे खुरप्याने तण काढताना विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने तरुणाचा मृत्यू

जोरदार विजेचा धक्का बसल्याने घटनास्थळीच मृत्यू
Shirol  Abdullat  Youth Electrocution
Shirol Abdullat Youth ElectrocutionPudhari
Published on
Updated on

Shirol Abdullat Youth Electrocution

अब्दुललाट : अब्दुललाट (ता. शिरोळ) येथे शेतातील विद्युत तारेला स्पर्श झाल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि.९) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. सम्मेद बाळासो गिरमल (वय ३४) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सम्मेद गिरमल हे सकाळी आपल्या शेतात तण काढण्यासाठी गेले होते. शेतात खुरप्याने तण काढत असताना त्यांचा विद्युत तारेला स्पर्श झाला. जोरदार विजेचा धक्का बसल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

Shirol  Abdullat  Youth Electrocution
Kolhapur Flood: हिप्परगी बॅरेजचे २१ दरवाजे उघडले;...पूरधोका कमी होण्यास मदत

बराच वेळ होऊनही सम्मेद घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शेजारच्या शेतकऱ्याशी संपर्क साधून पाहणी करण्याची विनंती केली. शेतकरी घटनास्थळी पोहोचला असता सम्मेद हे बेशुद्धावस्थेत पडलेले दिसून आले. त्यानंतर त्यांच्या वडिलांना बोलावण्यात आले. मुलाचा मृतदेह पाहताच त्यांनी एकच हंबरडा फोडला. या घटनेची वार्ता गावात पसरताच घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली.

घटनास्थळी महावितरणचे सहाय्यक अभियंता अभिजित लोखंडे यांनी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची नोंद कुरुंदवाड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news