

पेठवडगाव : वाठार येथील पंजाबी ढाबा परिसरात वडगाव पोलिसांनी गावठी पिस्तुलासह चारचाकी असा 10 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी संशयित अजय आबाजी सिद (वय 26, रा. बिरदेवनगर, पारगाव, ता. हातकणंगले) या तरुणास ताब्यात घेण्यात आले.
वडगावचे पोलिस निरीक्षक प्रमोद शिंदे यांना सिद हा ढाब्याबर येणार असल्याची माहिती मिळाली. सोमवारी रात्री पोलिस उपनिरीक्षक भरत पाटील, सहायक फौजदार आबा गुंडणके, शरद मेणकर, महेश गायकवाड, राजू साळुंखे यांनी सापळा रचून चारचाकीसह (एम.एच. 09 एफ.व्ही. 9671) तरुणाला पकडले. त्यामध्ये ड्रायव्हिंग सीटखाली बॅगेत गावठी पिस्तुल (अग्निशस्त्र), बनावट ड्रायव्हिंग लायसन्स व साहित्य आढळले. वडगाव न्यायालयाने त्याला एक दिवस पोलिस कोठडी सुनावली.