कोल्‍हापूरः राधानगरी तालुक्‍यातील कंथेवाडीत आढळला तरुणाचा मृतदेह

Kolhapur News | संबधित तरुण सेंट्रींग कामगार
कोल्‍हापूरः राधानगरी तालुक्‍यातील कंथेवाडीत आढळला तरुणाचा मृतदेह
Published on
Updated on

गुडाळ :-पुढारी वृत्तसेवा राधानगरी तालुक्यातील शिरगाव-पिरळ मार्गावर कंथेवाडी गावच्या हद्दीत तळे नावाच्या शेतात रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास राहुल शंकर पाटील( वय 40 ) रा. कोते ता. राधानगरी या तरुणाचा मृतदेह संशयास्पदरीत्या आढळून आला. राहुल हा सेंट्रींग कंत्राटदार असून त्याने विषारी औषध प्राशन करून जीवन संपवल्‍याचा संशय आहे. रात्री नऊ वाजता राधानगरी ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली असून त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

घटनास्थळी आणि राधानगरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कंथेवाडी ग्रामस्थांना दुपारी तळे नावाच्या शिवारात आनंदा विष्णू पाटील यांच्या पडसर शेतात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो पाहून कुकुडवाडी येथील सुभाष गोरुले यांनी हा मृतदेह आपला नातेवाईक राहुल याचा असल्याचे ओळखले. त्यांनीच राधानगरी पोलिसात वर्दी दिली.

राहुल हे शुक्रवारी कामावर जातो म्हणून आपल्या दुचाकीवरून घराबाहेर पडले होते. मृतदेह आढळलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर रस्त्यावर त्यांची ही दुचाकी उभी होती. राहुल यांच्या मागे आई-वडील पत्नी पहिलीमध्ये शिकणारा राजवीर आणि अंगणवाडीत शिकणारा ऋग्वेद अशी दोन लहान मुले आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशीच पाटील परिवारावर असे संकट कोसळल्याने कोते परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रात्री राहुल यांचा मृतदेह घरी आणल्यानंतर पत्नी रूपाली आणि आई-वडिलांनी फोडलेला हंबरडा ऐकून उपस्थित हळूहळून गेले.रात्री उशिरा राहुल यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news