कोल्हापूर : पुलाची शिरोली येथे दारूच्या नशेत तरूणाचा मृत्यू

Shiroli youth death: मृतदेह नेण्यासाठी आणलेली अँम्बुलंन्स शेतात शिरून अडकून पडली
Kolhapur News
मृतदेह नेण्यासाठी आणलेली शेतात अडकून पडलेली अँम्बुलंन्स.pudhari photo
Published on
Updated on

शिरोली एमआयडीसी : पुलाची शिरोली ता. हातकणंगले येथे लोटस फर्निचर शेजारी दारूच्या नशेत पडलेल्या ३७ तरूणाचा मृत्यू झाला. मयत तरूणाचे नाव प्रविण प्रताप स्वामी (रा. राजारामपुरी कोल्हापूर) असे असून तो व्यसनाधीन होता त्याचे व्यसन सोडवण्यासाठी त्याला काही दिवसापूर्वीच व्यसनमुक्ती केंद्रात पाठवले होते तेथून तो घरी आल्यावर त्याने परत दारू पिण्यास सुरू केली होती. तो दारू पिऊन पुलाची शिरोली येथे शनिवारी पडल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे.

हा मृतदेह नेण्यासाठी १०८ अँम्बुलंन्स मागवली पण ही आलेली अँम्बुलंन्स चालकाच्या चुकीने शेतात शिरली पण ती अँम्बुलंन्स बाहेर काढणे मुश्किल झाले जवळ जवळ तास दीड तास अडकून पडल्याने दुसरी अँम्बुलंन्स मागवावी लागली. मग प्रविण याचा मृतदेह नेला उत्तरीय तपासणीसाठी कोल्हापूर येथील सिपीआर हॉस्पीटल येथे नेला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news