Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपूर परिसराला पावसाने झोडपले; अनेक घरांचे पत्रे उडाले

झाडे कोसळली : घरात पाणी शिरले; शिरोळ, उदगावातही धुवाँधार
Jaysingpur Heavy Rain
जयसिंगपुर : 1) येथील नांदणी रोडवर घरांचे पत्रे उडून रस्त्यावर पडले होते.
Published on
Updated on

जयसिंगपूर : वादळी वारा, विजांचा कडकडाट, गारासह पावसाने जयसिंगपूर, शिरोळ, उदगाव, नांदणी, धरणगुत्ती, संभाजीपुरासह परिसरात दीडतास धुमाकूळ घातला. परिसरातील अनेक घरांवरील पत्रे उडून गेले, तर अनेक ठिकाणी झाडे कोसळली. जयसिंगपुरातील लक्ष्मी रोडवर अनेक घरांत पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.

मंगळवारी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुरू झाला. बघता बघता पावसास सुरुवात झाली. त्यामुळे जयसिंगपूर-शिरोळ मार्गावरील झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. परिसरातील अनेक घरांवरचे पत्रे उडाले. नांदणी रोड, लक्ष्मी रोड, सांगली-कोल्हापूर महामार्ग, शाहूनगर आदी भागांत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. रस्ते, गटारी तुडुंब भरल्या. सखल भागात पाणी साठले.

बाजारपेठेत तारांबळ

बाजारपेठेत खरेदी विक्रीसाठी आलेल्या नागरिकांची पावसामुळे तारांबळ उडाली. विद्युत पुरवठाही खंडित झाला होता. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मान्सूनपूर्व पावसामुळे काही अंशी नागरिकांना दिलासा मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news