

कोल्हापूर : महावितरण कंपनीतर्फे 33 के.व्ही. लाईनच्या देखभाल-दुरुस्तीचे काम सोमवारी (दि. 30) करण्यात येणार आहे. परिणामी, विद्युतपुरवठा बंद राहणार असल्याने पाणी उपसा होऊ शकणार नाही. त्यामुळे कोल्हापूर शहरासह संलग्नित उपनगरे, ग्रामीण भागातील दैनंदिन पाणीपुरवठा सोमवारी बंद राहणार आहे. तसेच, मंगळवारी (दि. 31) अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.
शहरातील ए, बी वॉर्ड, त्यास संलग्नित उपनगरे, ग्रामीण भाग व शहरांतर्गत येणार्या लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरुजी वसाहत, राजे संभाजीनगर, क्रशर चौक, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंबे रोड, शिवाजी पेठ, चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाद्वार रोड, मंगळवार पेठ काही भाग.
संपूर्ण सी, डी वॉर्डअंतर्गत दुधाळी, गंगावेस, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, ब—ह्मपुरी, बुधवार पेठ तालीम परिसर, सिद्धार्थनगर, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफिस, बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज परिसर, आझाद चौक, उमा टॉकीज, महालक्ष्मी मंदिर परिसर, गुजरी, मिरजकर तिकटी, देवल क्लब.
ई वॉर्डअंतर्गत खानविलकर पेट्रोल पंप परिसर, शाहूपुरी 5, 6, 7 व 8 वी गल्ली, कुंभार गल्ली व बागल चौक इत्यादी भागांचा समावेश आहे. नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पत्रकाद्वारे केले आहे.