Kolhapur News : निम्‍म्‍या शहराचा पाणीपुरवठा आज बंद

महावितरणच्या बालिंगा उपकेंद्रात दुरुस्तीचे काम
Kolhapur water supply
कोल्हापूरचा पाणीपुरवठा Pudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : महावितरणच्‍या बालिंगा उपकेंद्रातील ३३ केव्ही मुख्य वीज वाहिनीच्‍या देखभाल दुरुस्तीमुळे सोमवारी (दि. १७) निम्म्‍‍य्‍या शहरातील पाणीपुरवठा सोमवारी बंद राहणार आहे. तसेच मंगळवारीही (दि. १८) अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

उपकेंद्रातील दुरुस्‍तीमुळे ए, बी, वॉर्ड त्यास सलग्नित उपनगरे, लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड, साने गुरुजी वसाहत, राजेसंभाजीनगर, क्रशर चौक, आपटेनगर टाकी, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंभे रोड, शिवाजी पेठ, चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाद्वार रोड, मंगळवार पेठ काही भाग, सी, डी वॉर्ड अंतर्गत दुधाळी, गंगावेस, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, ब्रह्मपुरी, बुधवार पेठ तालीम, सिद्धार्थनगर, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ चौक, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफिस, बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज परिसर, आझाद चौक, उमा टॉकीज, महालक्ष्मी मंदिर, गुजरी, मिरजकर तिकटी, देवल क्लब. ई वॉर्ड अंतर्गत खानविलकर पेट्रोल पंप, शाहूपुरी पाचवी ते आठवी गल्ली, कुंभार गल्ली व बागल चौक या परिसरात सोमवारी पाणीपुरवठा बंद राहील. नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून कोल्हापूर महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news