

कौलवः परिते (ता.करवीर)येथील ज्योतिर्लिंग यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावातील भाविक मानाची सासनकाठी घेऊन वाडी रत्नागिरीला गेले असता त्यांना मारहाण झाली आहे. या प्रकरणाचा योग्य तपास करावा आणि दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशा सूचना कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिल्या आहेत. असल्याची माहिती शेतकरी सेना प्रदेशचे सचिव जनार्दन पाटील, सरपंच मनोज पाटील व शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अजित पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
परिते येथील भाविकांना झालेल्या मारहाणीच्या घटनेचा जिल्ह्यातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच व विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनी वरून जाहीर निषेध करून भाविकांना पाठिंबा दिला असल्याची माहिती ही त्यांनी दिली.
भाविकांना झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर सखोल चौकशी करावी अशी मागणी गावातील प्रमुखांनी पालकमंत्री आबिटकर यांच्याकडे केली होती त्यांनी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून दोषींवर कारवाई करा अशी सूचना दिली असल्याचे पाटील यांनी सांगितले
जिल्ह्यातील विविध गावचे सरपंच व विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आज फोनवरून सरपंच पाटील व अन्य प्रमुखांशी संपर्क साधून पाठिंबा दिला आहे. अंबाबाई मंदिर अन्नछत्र विभागाचे अध्यक्ष संजय साळुंखे, म्हाळूंगे चे सरपंच प्रमोद पाटील , राशिवडे बुद्रुक चे सरपंच अशोक पाटील राधानगरी तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष संभाजी आरडे, भारतीय जनता पक्षाचे करवीर तालुका अध्यक्ष हंबीरराव पाटील, बाबा इंदुलकर, बेलेचे सरपंच दीपक पाटील केर्लीचे सरपंच सचिन चौगुले, उचगावचे उपसरपंच संदीप पाटील , यांच्यासह कौलव घोटवडे, कोथळी तसेच भोगावती परिसरातील बहुसंख्य गावच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध करून भाविकांना पाठिंबा दिला आहे . या घटनेच्या निषेधार्थ तीव्र जनआंदोलन उभारणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले .