Kolhapur Flood : वेदगंगा नदीला पूर! मुरगुडचा संपर्क तुटला; आदमापूर, निढोरी गावांचा पाणीपुरवठा जॅकवेल पाण्याखाली

Kolhapur Flood | वेदगंगा नदीला पूर! मुरगुडचा संपर्क तुटला; आदमापूर, निढोरी गावांचा पाणीपुरवठ्याचा जॅकवेल पाण्याखाली
Kolhapur Flood | वेदगंगा नदीला पूर! मुरगुडचा संपर्क तुटला; आदमापूर, निढोरी गावांचा पाणीपुरवठ्याचा जॅकवेल पाण्याखाली

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा : भुदरगड तालुक्यासह मुरगुड परिसरात होत असलेल्या संततधार, दमदार मुसळधार पावसामुळे वेदगंगा नदीच्या पाणी पात्रात मोठी वाढ झाली आहे. गेले दोन दिवस पाणी पात्रा बाहेर पडले होते. पावसाचा जोर कायम राहिल्याने निपाणी-देवगड रस्त्यावर मुरगुड नजिक स्मशान शेड जवळ रस्त्यावर पुराचे पाणी आले आहे. रस्त्यावरून दोन फुटांपेक्षा जास्त पाणी वाहत असल्याने येथून होणारी वाहतूक बंद झाली आहे. तसेच मुरगुडच्या दत्त मंदिर परिसरात देखील पाणी आल्याने वाघापूर मुरगुड वाहतूक बंद झाली आहे. दिंडोरी व मुरगुड येथे पोलिसांनी आठ ठिकाणी बॅरिकेट उभा करून पूर संदर्भात सूचना दिल्या आहेत.

वेदगंगा नदीच्या पाणीपत्रात वाढ झाल्याने नदीवरील सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या बंधाऱ्या वरून होणारे वाहतूक तीन दिवसांपूर्वीच बंद झाली आहे. लोक प्रवासी पर्यायी मार्गाचा वापर करून मुरगुडला ये-जा करत होते, पण पर्यायी मार्गही बंद झाल्याने आता मुरगुडचा संपर्क तुटला आहे. आदमापूर, निढोरी या दोन गावांना पिण्याचा पाणीपुरवठा करणारी जॅकवेल पूर्णपणे पाण्यामध्ये गेले आहेत. त्यामुळे या दोन्ही गावांना पाणी पुरवठा करण्यात अडचण निर्माण होत आहे.

सध्या मुरगुड निढोरी दरम्यान असणाऱ्या मुरगुडच्या स्मशान शेडजवळ रस्त्यावर अंदाजे दोन फुट पाणी आले आहे. जेथून पाणी वाहत आहे त्याच ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे. रस्ता कॉंक्रिटी करणासाठी एका बाजूला खोदला गेला आहे तर दुसऱ्या एकेरी बाजूनेच या ठिकाणी वाहतूक सुरू होती. काँक्रिटी करणासाठी ऐन पावसाळ्यात महापूर सदृश्य कालावधीत रस्ता खोदल्यामुळे प्रवासी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. असाच पावसाचा जोर कायम राहिला तर या ठिकाणी पाण्याची पातळी वाढू शकते. दोन्ही बाजूला टाकलेला भराव पाण्याच्या विसर्ग होण्यास अडचणीचा ठरत आहे. या परिसरात असणाऱ्या बेनिग्रे, करंजीवने, अवचितवाडी ,सोनाळी, कुरुकली येथील तलाव क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. मुरगुड परिसरात काल दिवसभर पावसाने थोडी विश्रांती घेतली होती पण संध्याकाळ पासून रात्रभर मुसळधार पाऊस झाला आहे.

जुलै महिन्यातील पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण दिसत आहे. पूराचे पाणी पाहण्यासाठी निढोरी व मुरगुड दोन्ही बाजूस नागरिकांची मोठी गर्दी दिसत आहे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news