Kolhapur News : वसई वाहतूक पोलिसाने गोळी झाडून संपविले जीवन

चंदगड तालुक्यातील नागरदळे येथील घटना
Kolhapur News
वसई वाहतूक पोलिसाने गोळी झाडून संपविले जीवन
Published on
Updated on

चंदगड : वसई, मुंबई येथील वाहतूक पोलिस कॉन्स्टेबलने पत्नीसोबतच्या वादातून स्वतःच्या १२ बोअर बंदुकीतून गोळी झाडून घेत जीवन संपविल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने चंदगडसह वसई, मुंबई पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

दयानंद कृष्णा पाटील (४२, मूळ गाव नागरदळे, ता. चंदगड, सध्या रा. वसई वाहतूक पोलिस क्‍वार्टर्स, वसई) असे त्याचे नाव आहे. या घटनेच्या काही वेळापूर्वी वाद मिटवण्यासाठी सुरू असलेल्‍या बैठकीवेळी दयानंद याने हवेत गोळीबार करून खळबळ उडवून दिली. ही घटना मंगळवारी सायंकाळी चार वाजता नागरदळे येथे राहत्या घरी घडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news