

आजरा : आजरा तालुक्यातील उत्तूर येथे एका मालवाहतूक टेम्पोमधून 13 लाख रुपयांहून अधिक रकमेची चोरी करणार्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. शुभम रमेश भोसले (वय 27, रा. लिगाडे मळा, इचलकरंजी), अभिषेक नंदकुमार पोवार (वय 24, रा. इचलकरंजी) आणि ऋषीकेश सुभाष चौगुले (वय 27, रा. नारळ चौक, इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत.
त्यांच्याकडून 13 लाख 15 हजार रुपयांची रोकड, एक दुचाकी आणि तीन मोबाईल हँडसेट असा एकूण 14 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांना पुढील कारवाईसाठी आजरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या नेतृत्वाखालील पथकातील अंमलदार प्रवीण पाटील, समीर कांबळे आणि दीपक घोरपडे यांनी इचलकरंजीतील नारळ चौक परिसरात सापळा रचला आणि तिघांनाही ताब्यात घेतले.