

मुदाळतिट्टा, पुढारी वृत्तसेवा : मुदाळ (ता.भुदरगड) येथील हुतात्मा स्वामी -वारके सुतगिरणीच्या अध्यक्षपदी कसबा वाळवे (ता.राधानगरी) येथील उमेश नामदेवराव भोईटे यांची निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सुतगिरणीचे उपाध्यक्ष बापूसो आरडे होते. प्रमुख उपस्थितीत संस्थापक व बिद्रीचे अध्यक्ष के.पी.पाटील होते. सुतगिरणीचे अध्यक्ष पंडीतराव केणे यांनी राजीनामा दिल्याने या रिक्त पदावर संचालक उमेश भोईटे यांचे नाव केणे यांनी सुचविले. Umesh Bhoite
के. पी. पाटील म्हणाले की, सुतगिरणीची स्थापना होऊन १४ वर्षे झाली. काटकसरीचा कारभार करत संस्था राज्यात उत्कृष्ट ठरली आहे. साडेतीनशे कामगार काम करत असून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. यापुढे नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी संस्थेची यशस्वीतेसाठी कार्यरत रहावे. Umesh Bhoite
यावेळी काकासो देसाई, तात्यासाहेब जाधव, सुरेशराव सुर्यवंशी, विकास पाटील, जगदीश पाटील, दतात्रय पाटील, अविनाश तेली, पंढरीनाथ पाटील, जयवंत पाटील, विठ्ठलराव कांबळे आदी संचालक उपस्थित होते. कार्यकारी संचालक मिलिंद कुलकर्णी यांनी स्वागत केले. सेक्रेटरी सुरेश पाटील यांनी आभार मानले.
सुतगिरणीची स्थापना झाली. त्यावेळी प्रवर्तक मंडळात सुशिलाताई भोईटे होत्या. त्यानंतर माजी आमदार नामदेवराव भोईटे अध्यक्ष होते. आता मुलगा बिद्रीचे संचालक उमेश भोईटे यांना संधी मिळाल्याने तिसऱ्यांदा घरात हे पद मिळाले आहे.
बिद्री साखर कारखाना निवडणूक निमित्ताने के.पी. व ए.वाय .यांच्यात फूट पडली. त्यानंतर समविचारी पक्ष, गट यांच्याशी समेट करत के. पीं.नी राधानगरी तालुक्यात सात संचालकांना तर स्विकृत संचालक पदावर नरतवडेचे फतेसिंग पाटील यांना तर सुतगिरणीत मांगोलीचे जयवंत पाटील यांना संधी दिली. आता सुतगिरणीच्या अध्यक्षपदी उभेश भोईटे यांना संधी देत राधानगरी तालुक्यात पदांची खैरात केली आहे. यावरून आगामी विधानसभा निवडणुकीची पेरणी सुरु असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा