कोल्‍हापूर : वन्यजीव शिकार प्रकरणी दोघांना अटक, तीन दिवसांची वनकोठडी !

Forest Department | वनविभागाची धडक कारवाई; तारेचे फासके आणि मृत ससे जप्त
Forest Department
कोतोली येथे वन्यजीव शिकारी करताना पकडलेले आरोपी आणि जप्त मुद्देमाल.Pudhari Photo
Published on
Updated on

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा

मलकापूर वनपरिक्षेत्रातील कोतोली येथे वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या दोघांना वन विभागाने रंगेहाथ पकडले. सुरेश नारायण आगलावे (वय ३९, राहणार आगलावेवाडी, कोतोली) आणि वसंत विठ्ठल शिराळकर (वय ४७) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून तारेचे फासके आणि दोन मृत ससे जप्त करण्यात आले आहेत.

वनविभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, १८ एप्रिल २०२४ रोजी वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोतोली परिसरात सापळा रचला होता. त्यावेळी हे दोन्ही आरोपी तारेच्या फासक्याच्या साहाय्याने सशाची शिकार करून येत असताना मिळून आले. घटनास्थळावरून दोन मृत ससे, २३६ तारेचे फासके, एक बॅटरी, जेवणाचा डबा, एक मोबाईल फोन आणि एक पारळी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपींना शाहूवाडी मलकापूर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी सामील असण्याची शक्यता असून, पुढील तपास उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद आणि सहाय्यक वनसंरक्षक कमलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तपासासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी मलकापूर श्रीमती उज्वला मगदूम, परिमंडळ वनाधिकारी पांडुरंग चव्हाण, वनरक्षक ऋषिकेश झांजुर्णे, वनरक्षक विठ्ठल खराडे, वनरक्षक अक्षय चौगुले, वनरक्षक गुरुबच्चन हिप्परकर, वनरक्षक स्वाती मेथे, वाहन चालक अनिल पाटील यांनी कारवाईत भाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news