Kolhapur Crime : कोतोलीतील चार गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार

पन्हाळा पोलिसांची कडक कारवाई
तडीपार
तडीपारPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

पन्हाळा : पन्हाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांवर प्रशासनाने कडक कारवाई करत त्यांना जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. सार्वजनिक सुव्यवस्था व नागरिकांच्या सुरक्षिततेला बाधा पोहोचू नये, यासाठी उपविभागीय दंडाधिकारी (पन्हाळा उपविभाग) यांनी हे आदेश दिले आहेत.

या कारवाईअंतर्गत कोतोली (ता. पन्हाळा) येथील ऋषीकेश विलास चौगुले, विलास मारूती चौगुले आणि संदीप नामदेव जाधव या तिघांना ६ महिन्यांसाठी, तर सुमित शंकर सातपुते याला १ वर्षाच्या कालावधीसाठी कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्रातून हद्दपार करण्यात आले आहे. हे चौघेही पन्हाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, हे हद्दपार केलेले आरोपी कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीत आढळून आल्यास किंवा त्यांच्याबाबत काही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ पन्हाळा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पन्हाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news