

बांबवडे : शाहूवाडी तालुक्यातील तुरुकवाडी फाटा येथे रत्नागिरीहून कराडकडे जात असलेला ट्रक अमेणी घाटात ब्रेक निकामी झाला. चालकाने प्रसंगावधान राखत तो विश्वास पाटील यांच्या घरावर घातला. यात नामदेव पाटील यांच्या मालकीच्या अनुज्वेलर्स या सोन्याच्या दुकानासह घराचे लाखो रुपयाचे नुकसान झाले.
सकाळी ९ वाजता गजबजलेल्या तुरुकवाडी फाटा या चौकात ही घटना घडली. चालकांच्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला. घटनेचा पंचनामा करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.